एकच वादा ऋतुराज दादा... पुन्हा गोलंदाजांची धुलाई करत चेन्नई २०० पार

चेन्नई : ऋतुराज गायकवाडचे शतक फक्त दोन धावांनी हुकले असले तरी चेन्नईच्या संघाला मात्र त्यांनी २०० धावांचा पल्ला पार करून दिला. ऋतुराजने गेल्या सामन्यात शतक झळकावले होते. पण यावेळी ऋतुराजने ५४ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ९८ धावांची खेळी साकारता आली. डॅरिल मिचेलनेही यावेळी अर्धशतक झळकावले. या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईच्या संघाने २० षटकांत ३ बाद २१२ अशी मजल मारता आली.

अजिंक्य रहाणेच्या रुपात पुन्हा एकदा चेन्नईला पहिला धक्का बसला, अजिंक्यला यावेळी ९ धावा करता आल्या. अजिंक्य बाद झाल्यावर ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिचेल यांची जोडी चांगलीच जमली. या दोघांनी मिळून पहिल्या सहा षटकांच्या पॉवर प्ले मध्ये संघाला १ बा ५० अशी मजल मारून दिली. पण त्यानंतर चेन्नईच्या संघाने आपला गिअर बदलल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यानंतरच्या ५० धावा चेन्नईने लगेच जमवल्या. चेन्नईने यावेळ १०.५ षटकांत आपले शतक पूर्ण केले. ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिचेल यावेळी हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडत होते.

ऋतुराजने यावेळी फक्त २७ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. आपल्या या अर्धशतकात ऋतुराजने सात चौकार आणि एक षटकार लगावला होता. त्यानंतर थोड्याच वेळात मिचेलचे शतकही पाहायला मिळाले. मिचेलने यावेळी २९ चेंडूंत आपले अर्धशतक झळकावले, यामध्ये सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. पण त्याचवेळी जयदेव उनाडकटने मिचेलला बाद केले. मिचेलने यावेळी ३२ चेंडूंत ५२ धावा केल्या, जामध्ये सात चौकार आणि एक षटकार होता. मिचेल बाद झाला असला तरी ऋतुराज हा धडाकेबाज फटकेबाजी करतच होता. काही वेळातच ऋतुराजला साथ मिळाली ती शिवम दुबेची.

ऋतुराज आणि शिवम यांनी हैदराबादच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. शिवम सेट झाला आणि त्यानंतर तोच ऋतुराजपेक्षा जास्त आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे ऋतुराजही त्याला चांगली साथ देत होता. या दोघांनी २३ चेंडूंत आपली अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ऋतुराजने यावेळी आपले शतक पूर्ण करता आले नाही, नाही तर त्याचे हे सलग दुसरे शतक ठरले असते.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-28T16:06:05Z dg43tfdfdgfd