चेन्नईने एकाच विजयाने तीन संघांना दिला धक्का, पॉइंट्स टेबलमध्ये कोणता मोठा बदल झाला पाहा...

चेन्नई : फक्त एका विजयाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने तीन संघाला धक्के दिल्याचे पाहायला मिळाले. कारण या एका विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. कारण या सामन्यात चेन्नईच्या संघाने ७८ धावांनी मोठा विजय साकारला. चेन्नईचा हा मोठा विजय होता. त्यामुळेच गुणतालिकेत मोठा विजय झाल्याचे समोर आले आहे.

चेन्नईच्या संघाने गेले दोन सामने गमावले होते. त्यामुळे चेन्नईचा संघ हा गुणतालिके खाली खाली जात होता. पण या एका विजयाने चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत मोठी भरारी घेतली आहे. यापूर्वी चेन्नईच्या संघाने आठ सामने खेळले होते. या आठ सामन्यांपैकी चेन्नईने आठ सामने जिंकले होते, तर त्यांना चार सामन्यांत पराभव पकत्करावा लागला होता. त्यामुळे चेन्नईच्या संघाचे आठ गुण झाले होते. या आठ गुणांसह चेन्नईचा संघ हा सहाव्या स्थानावर होता. या सामन्यात चेन्नईने हैदराबादवर मोठा विजय साकारला, त्यामुळे चेन्नईला या विजयानंतर फक्त दोन गुणच मिळाले नाहीत तर त्यांच्या नेट रन रेटमध्येही मोठा फरक पडल्याचे पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला चेन्नईच्या संघाचे १० गुण झाले आहे. गुणतालिकेत एकूण पाच संघांचे समान १० गुण आहेत.

चेन्नईचा संघ हा साहव्या स्थानावर होता. पण या विजयानंतर आता चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत सनरायझर्स हैदाराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या तिन्ही संघांना पिछाडीवर टाकले आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत मोठी झेप घेतली असून ते थेट तिसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहेत. कारण चेन्नई रन रेट या मोठ्या विजयानंतर जवळपास दुप्पट झाला आहे. त्यामुळेच त्यांना गुणतालिकेत सहाव्यावरून थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचता आले आहे. त्यामुळे हा एक विजय चेन्नईसाठी सर्वात महत्वाचा ठरला आहे. आता चेन्नईचे ९ सामने झाले आहेत, ज्यामध्ये त्यांनी पाच लढती जिंकल्या आहेत आणि चार त्यांचे पराभव झाले आहेत.

चेन्नईच्या संघाने २१२ धावा या सामन्यात केल्या होत्या. चेन्नईने हैदराबादला फक्त १३४ धावांत ऑल आऊट केले आणि त्यांनी ७८ धावांनी दणदणीत विजय साकारला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-28T19:06:41Z dg43tfdfdgfd