टी-२० विश्वचषकात 'या' ३ खेळाडूंवर बाजी लावणं टीम इंडियाला पडणार भारी? भारताकडून पुन्हा तीच चूक!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अहमदाबादमध्ये सचिव जय शाह आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील T20 विश्वचषक संघाची घोषणा केली. २ जूनपासून प्रथमच यूएस-वेस्ट इंडिजमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी निवडकर्त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. उदाहरणार्थ केएल राहुल आणि शुभमन गिल यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहलवर विश्वास दाखवला आहे. मात्र संघातील या तीन खेळाडूंवर विश्वास ठेवणे महागात पडू शकते असे दिसते. भारत पुन्हा आपली जुनी चूक करतोय का असा सवाल येत आहे. जाणून घ्या ते खेळाडू कोणते?

विराट कोहली

विराट कोहली हा संघातील सर्वात सीनियर फलंदाज आहे यात शंका नाही. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करून तो ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. पण टी-२० फॉरमॅटने आता बराच वेगवान पल्ला गाठला आहे. यात ३५ चेंडूत अर्धशतक न करता १० चेंडूत ३५ धावा करून बाद होणाऱ्या खेळाडूला अधिक महत्त्व आहे. यामुळे विराट कोहलीला त्याच्या स्ट्राईक रेटवर काम करावे लागेल. त्याचा स्ट्राईक रेट पाहता त्याचे विश्वचषकातील स्थान प्रश्नचिन्ह उपस्थित करते. यातून विश्वचषकासाठी टीम इंडियाने विराट कोहलीवर धाडसी बाजी लावली आहे, असं बोलणं वावगं ठरणार नाही.

हार्दिक पंड्या

सध्याच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या अष्टपैलू हार्दिक पंड्याला त्याचा खराब फॉर्म असूनही संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. हार्दिक पंड्या या मोसमात फक्त दोनच षटके टाकली. त्याचा वेगही पूर्वीपेक्षा खूपच कमी झाला आहे. हार्दिक पंड्याच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह कायम आहे. पूर्ण तंदुरुस्त आणि फॉर्ममध्ये असताना हार्दिक ते करतो जे देशातील कोणीही करू शकत नाही. मात्र या विश्वचषकात तो स्फोटक फलंदाजी करू शकला नाही तर त्याची निवड व्यर्थ ठरेल.

अक्षर पटेल

भारतीय संघात रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांच्या रूपाने प्रत्येकी चार फिरकीपटू आहेत. क्वचितच असा कोणताही सामना असेल की ज्यामध्ये दोनपेक्षा जास्त फिरकी गोलंदाज प्लेइंग इलेव्हनमध्ये एकत्र असतील. रवींद्र जडेजाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला असला तरी त्याच्या आणि अक्षर पटेलच्या खेळात फारसा फरक नाही. दोघेही एकमेकांच्या सारखे आहेत. अशा परिस्थितीत अक्षर आणि जड्डू यापैकी एकाची निवड करून स्पेशालिस्ट पॉवर हिटरचा समावेश करता आला असता.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-30T14:43:48Z dg43tfdfdgfd