पंचांच्या निर्णयावरुन वाद; गौतम गंभीरला राग अनावर, एका रनसाठी अंपायर्ससोबत भिडला, पाहा व्हिडिओ

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स असा थरारक सामना झाला. ज्यात पंजाबने कोलकाताचा त्यांच्या घरच्या मैदानावरच पराभव केला. यंदाच्या हंगामात कोलकत्ताचा गौतम गंभीर थोडा शांत असल्याचे दिसत होते. पण आरसीबी विरुद्धच्या सामन्यात गंभीरचा राग आपल्याला पहायला मिळाला. आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्यात गंभीरने पंचाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत वाद घातला होता. सुनील नरायणच्या जागी दुसऱ्या खेळाडूला मैदानात न जाऊ दिल्याने गंभीर पंचांशी भांडत होता. आता पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात गंभीर पुन्हा पंचाशी भिडल्याचे चित्र पहायला मिळाले.

नेमकं काय घडलं?

१४ व्या षटकात कोलकाता नाइट रायडर्स संघ बाराहून अधिक रनरेटने फलंदाजी करत होते. आंद्रे रसेल आणि व्यकंटेश अय्यर फलंदाजी करत होते. शेवटच्या षटकात पंजाबचा राहुल चहर गोलंदाजी करत होता. शेवटच्या षटकात राहुल चहरच्या अंतिम चेंडूवर आंद्रे रसेलने कव्हरच्या दिशेने चेंडू मारला. आशुतोष शर्मा तिथेच क्षेत्ररक्षण करत होता. त्याने चेंडू उचलून विकेटकीपरच्या दिशेने फेकला. विकेटकीपर आणि आशुतोष शर्माच्या दोघांत जास्त अंतर होते. त्यामुळे रसेल आणि अय्यर यांनी १ धावा केली. परंतु यानंतरही कोलकाताला एक रन मिळाला नाही.

पंचाशी भिडला गंभीर

कोलकाता नाइट रायडर्सला १ रन मिळाला नाही कारण चेंडू फेकण्याआधीच मैदानातील पंचानी षटक पूर्ण झाल्याचा इशारा दिला होता. याचा अर्थ असा होतो की पंचाच्या इशाऱ्यानंतर त्या चेंडूवर धावा काढल्यास त्याचा स्विकार केला जाणार नाही. गौतम गंभीर यावर नाराज झाला. आपल्या जागेवरुन उठून तो चौथ्या पंचाकडे गेला. पंचाशी त्याने वाद घातला पण कोलकाताला १ रन मिळालाच नाही.

क्रिकेटमध्ये एका एका रनाला महत्त्व असते. जरी पंजाब किंग्सने सामना जिंकला असला तरी असेही होऊ शकले असते की एका रनामुळे विजय आणि पराभव ठरु शकला असता. याच कारणामुळे गंभीर कोलकाता संघाला १ रन न दिल्याने नाराज होता. कोलकाताने आपल्या मागच्या सामन्यातच आरसीबी विरुद्ध १ धावाने विजय मिळविला होता.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-27T15:32:04Z dg43tfdfdgfd