पंत की सॅमसन! पहिल्या सामन्यात रोहित शर्मा देणार 'या' खेळाडूला संधी? अशी आहे प्लेईंग XI

T20 World Cup 2024​ IND vs IRE Playing 11 Today : भारतीय क्रिकेट संघाच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) आजपासून सुरुवात होतेय. अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना जायटं किलर आयर्लंडशी (India vs Ireland) होणार आहे. स्पर्धेत उलटफेर करण्याची ताकद असलेल्या आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाला हलक्यात घेऊन चालणार नाही. टीम इंडियाची कमान सलग दुसऱ्यांदा रोहित शर्माच्या हातात आहे. 2022 वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सेमीफायनल गाठली होती. सेमीफायनलमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला होता.

यशस्वीला पाहावी लागणार वाट

भारतीय संघाने सराव सामन्यात बांगलादेशविरुद्ध दमदार कामगिरी केली होती. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि संजू सॅमसन मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. पण यानंतरही टीम इंडियाने 180 धावांचा टप्पा पार केला. ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने फटकेबाजी केली. सराव सामन्यात रोहित शर्माबरोबर संजू सॅमसन सलामीला उतरला होता. या सामन्यात यशस्वीला संधी मिळाली नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यातही यशस्वी जयस्वालला वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. 

पंत की सॅसमन कोणाला संधी?

आयपीएलच्या सतराव्या हंगामात संजू सॅसमनने तुफानी कामगिरी केली होती. तर बागंलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात ऋषभ पंतने फटकेबाजी करत आपला दावा मजबूत केला आहे. आता विकेटकिपर म्हणून दोघांपैकी कोणाला संघात निवडायचं यावरुन टीम व्यवस्थापनामध्ये संभ्रम आहे. अशात दोघांही प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंहचं खेळणं निश्चित आहे. अशात मोहम्मद सिराजला संघाबाहेर बसावं लागेल. तर फिरकीची मुख्य जबाबबदारी कुलदीप यादववर असेल. हार्दिक पांड्या चौथा गोलंदाज म्हणून जबाबदारी सांभाळेल. याशिवाय ऑलराऊंडर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेललाही संधी मिळण्याची शक्यता आहे. 

सलामीला कोण येणार?

यशस्वी जयस्वालला बाहेर बसवल्यास टीम इंडियाच्या डावाची सुरुवात कर्णधार रोहित शर्माबरोबर स्टार फलंदाज विराट कोहली करु शकतो. तिसऱ्या क्रमांकावर टी20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादव असेल. तर चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंत मैदानावर उतरेल. 

हार्दिक पांड्या-शिवम दुबेलाही संधी

आयीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या शिवम दुबेचंही प्लेईंग इलेव्हनमधलं स्थान भक्कम आहे. शिवम दुबे पाचव्या क्रमांकाला फलंदाजीला उतरु शकतो. तर सहाव्या क्रमांकाव हार्दिक आणि सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेला संधी मिळेल.

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या (ऑलराउंडर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह.

2024-06-05T11:03:24Z dg43tfdfdgfd