मुंबईला पराभवानंतर मोठा धक्का, सामना संपल्यावर नेमकं असं घडलं तरी काय पाहा...

नवी दिल्ली: मुंबई इंडियन्सला लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव पत्करावा लागला. पण त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाला एक मोठा धक्का बसला आहे. हा सामान संपला आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघासाठी ही वाईट बातमी समोर आली आहे.

लखनौ सुपरजायंट्स व मुंबई इंडियन्स यांचा सामना एकन्ना स्टेडियमवर झाला. मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करत ७ विकेट्स गमावत १४४ धावा केल्या. लखनौसाठी हे लक्ष्य पुरेसे नव्हते. मार्कस स्टोइनिसने अर्धशतक पूर्ण करत लखनौला विजयाच्या जवळ नेले. स्टोइनिसने ४५ चेडूंत ६२ धावा करत सात चौकार व २ षटकार मारले. स्टोइनिसच्या याच खेळीमुळे लखनौने ४ चेंडू शिल्लक ठेवत विजय मिळविला.लखनौने मुंबईचा ४ विकेट्स राखून पराभव केला.

हा सामना संपला आणि त्यानंतर बीसीसीआयने एक गोष्ट सर्वांसमोर आणली आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने आयपीएलच्या नियमाचे उल्लंघन केल्याने बीसीसीआयने त्याला २४ लाख दंड ठोठावला आहे. मुंबई इंडियन्स संघ निर्धारित वेळेत आपली २० षटके पूर्ण करु शकला नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर इम्पॅक्ट प्लेअर व अन्य खेळाडूंना ६ लाख किंवा सामन्याची २५ टक्के रक्कम जे कमी असेल ते बीसीसीआयला दंड स्वरुपात लागणार आहे.

बीसीसीआयने आपल्या पत्रकात म्हटले की, ' मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या संघाने मंगळवारी, ३० एप्रिलला लखनौ सुपरजायंट्स संघाविरुद्ध धीम्या गतीने षटके टाकली त्यामुळे पंड्याला २४ लाख इतका दंड ठोठावला आहे. मुंबई इंडियन्स संघाकडून हा दुसऱ्यांदा प्रकार घडला आहे. या पूर्वीही धीम्या गतीने षटके टाकत त्यांनी आयपीएलच्या आचारसंहितेच्या नियमाचे उल्लंघन केले होते. त्यामुळे हार्दिकबरोबरच मुंबई संघाचे अकरा खेळाडू व त्यांच्या व्यतिरिक्त इम्पॅक्ट प्लेअर यांना प्रत्येकाला ६ लाख किंवा सामन्याची २५ टक्के रक्कम जी कमी असेल ती दंड स्वरुपात भरावी लागेल.'

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला एकीकडे टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळाले आहे. तर दुसरीकडे बीसीसीआयने हार्दिकवर कडक कारवाई केली आहे. लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक सोबतच मुंबई इंडियन्स संघाच्या अन्य खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला आहे.

यंदाचे आयपीएल पर्व हार्दिक पंड्यासाठी तितकेसे साजेसे ठरले नाही. आयपीएल लिलावात मुंबईने हार्दिकला संघात घेतले. त्यानंतर मुंबई संघाने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिकला कर्णधार केले तेव्हापासूनच खऱ्या वादास सुरुवात झाली. आयपीएल जसे सुरु झाले तेव्हा तर अजूनच परिस्थिती चिघळली, हार्दिकला मैदानात व मैदानाबाहेर दोन्हीकडे लोकांच्या रोषांचा सामना करावा लागला.

हार्दिक फलंदाजी व गोलंदाजीत आपला प्रभाव दाखवण्यास ही असमर्थ ठरला. मुंबई इंडियन्स संघाने आत्तापर्यंत १० सामने खेळले आहेत ज्यातील ७ सामन्यात पराभव मिळाल्याने गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या या पराभवामुळे मुंबईसाठी प्लेऑफचे दरवाजे बंद झाले आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-01T11:47:19Z dg43tfdfdgfd