रोहितनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? शर्यतीत काही खेळाडूंची नावे, मात्र 'याच्या' हाती संघाची सूत्रे मिळण्याची शक्यता

टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. यासह रोहित शर्मा आयसीसी ट्रॉफी जिंकणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला. जेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली. यासोबतच भारतीय संघासमोर आव्हानही निर्माण झाले आहे. खरं तर, रोहित शर्मा जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे यात शंका नाही. अशा परिस्थितीत आता रोहित शर्माच्या जागी कोणता खेळाडू टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या शर्यतीत ५ खेळाडूंची नावे आघाडीवर आहेत.

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. रोहित शर्मा २०२२ च्या टी-२० विश्वचषकापासून या फॉरमॅटपासून दूर होता. अशा परिस्थितीत हार्दिकने टीम इंडियाचे नेतृत्व केले. हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून १० जिंकले आहेत. ५ मध्ये संघाचा पराभव झाला असून १ सामना बरोबरीत राहिला आहे. हार्दिक पांड्या भारतीय संघाचा पुढचा कर्णधार होण्याची शक्यता आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्येही त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. रोहितच्या अनुपस्थितीतही तो भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. या काळात संघाची कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे.

सूर्यकुमार यादव

दीर्घकाळ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर १ फलंदाज असलेला सूर्यकुमार यादव देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. सूर्याला हे स्वरूप आवडते. त्याने ७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे. या कालावधीत टीम इंडियाने ५ सामने जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत. त्यामुळे सूर्यकुमारच्या हाती संघाची सुत्रे मिळण्याची शक्यता आहे.

ऋषभ पंत

यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा टीम इंडियाचा भावी कर्णधार मानला जात आहे. २०२२ च्या अखेरीस रस्ता अपघातात गंभीर जखमी झाले. अशा परिस्थितीत तो तब्बल १६ महिने क्रिकेटपासून दूर राहिला. पंतने आयपीएल २०२४ पूर्वी पुनरागमन केले. यानंतर २०२४ च्या टी-२० विश्वचषकात त्याने चमकदार कामगिरी केली. पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. या कालावधीत संघाला २ विजय आणि २ पराभव पत्करावे लागले आहेत. १ सामनाही अनिर्णित राहिला आहे.

शुभमन गिल

टी-२० विश्वचषक २०२४ नंतर भारतीय संघ आता झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. या मालिकेसाठी शुभमन गिलची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गिल पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आयपीएल २०२४ मध्ये त्याने गुजरात टायटन्सची कमान सांभाळली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-30T15:01:55Z dg43tfdfdgfd