सुनील नरेनची वादळी खेळी; कोलकाताचे लखनौ सुपर जायंट्ससमोर २३६ धावांचे लक्ष्य

आयपीएल २०२४ च्या ५४ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्ससमोर लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने २० षटकांत ६ विकेट गमावत २३५ धावा केल्या. लखनौला विजयासाठी २३५ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

सुनील नरेनने ३९ चेंडूंत ५ चौकार आणि ७ षटकारांसह ८१ धावा केल्या. रवी बिश्नोईने त्याला आपला बळी बनवले. संघाला तिसरा धक्का आंद्रे रसेलच्या रूपाने बसला. नवीन-उल-हकने त्याला शिकार बनवले. त्यानंतर आंग्रिशने ३२ धावा केल्या आणि श्रेयस (२३) आणि रमणदीप (२५*) यांनी धावा केल्या. एकना स्टेडियमवर प्रथमच संघाने २०० पेक्षा जास्त धावा केल्या. केकेआरकडून फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी केकेआरला चांगली सुरुवात करून दिली. फिल सॉल्टने १४ चेंडूत ३२ धावा केल्या. दोघांमध्ये ६१ धावांची भागीदारी झाली. आंगक्रिश रघुवंशीने २६ चेंडूत ३२ धावा केल्या. लखनौकडून नवीन-उल-हकने तीन बळी घेतले. तर यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि युधवीर सिंग यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

कोलकाता संघ गुणतालिकेत दुसऱ्या तर लखनौ तिसऱ्या स्थानावर आहे. कोलकाताने १० सामन्यांपैकी ७ जिंकले आहेत आणि ३ गमावले आहेत. कोलकाताच्या खात्यात १४ गुण आहेत. लखनौबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या खात्यात १२ गुण आहेत. १० सामन्यांत त्याने ६ जिंकले आहेत आणि ४ गमावले आहेत. हा सामना जिंकून कोलकाता संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-05T16:33:38Z dg43tfdfdgfd