KL RAHUL ने लखनऊची कॅप्टन्सी सोडली? निकोलस पुरन टॉसला का आला? चाहत्यांना धाकधूक

LSG vs PBKS, IPL 2024 : लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाणा क्रिकेट स्टेडियमवर लखनऊ सुपर जायएन्ट्स आणि पंजाब किंग्ज (Lucknow Super Giants vs Punjab Kings) यांच्यात आयपीएलचा 11 वा सामना खेळवला जातोय. आजचा सामना जिंकून लखनऊ विजयाचा नारळ फोडणार का? असा सवाल विचारला जातोय. अशातच आता सामन्यापूर्वी लखनऊच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. लखनऊचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) टॉससाठी आलाच नाही. त्याच्या जागी निकोलस पूरन (Nicholas Pooran) मैदानात टॉससाठी आला होता. त्यामुळे लखनऊच्या खेम्यात नेमकं काय चालूये? असा सवाल विचारला जात आहे. अशातच केएल राहुलने लखनऊची कॅप्टन्सी (LSG Captaincy) सोडली की काय? असा सवाल देखील सोशल मीडियावर विचारला जात होता. अशातच आता निकोलस पूरनने केएल राहुलच्या अनुपस्थितीचं कारण सांगितलं आहे.

काय म्हणाला निकोलस पूरन?

केएल राहुल दुखापतीनंतर पुनरागमन करत असल्याने आम्ही त्याला लोड देणार नाही. अशा परिस्थितीत आम्हाला त्याला बराच काळ चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये थोडा ब्रेक द्यायचा आहे. तो आज केवळ इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळेल, अशी माहिती निकोलस पूरनने दिली आहे. प्रत्येकानं संधीचा लाभ घ्यावा आणि सर्वोत्तम कामगिरी करावी, असंही निकोलसने म्हटलं आहे. त्यामुळे आता केएल राहुलने लखनऊची कॅप्टन्सी सोडणार की काय? असा सवाल देखील विचारला जात आहे.

दरम्यान, लखनऊने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. लखनऊ सुपर जाएंटसला पंजाबच्या मॅचपूर्वी धक्का बसलाय. डेव्हिड विलीनं आयपीएलमधून माघार घेतली. लखनऊमध्ये आता मॅट हेन्रीची एंट्री झाली आहे. 

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, निकोलस पूरन (C), मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ.

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (C), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरान, जितेश शर्मा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

2024-03-30T15:02:09Z dg43tfdfdgfd