SACHIN TENDULKAR : अफगाणिस्तानच्या यशावर 'क्रिकेटच्या देवा'ची मन जिंकणारी प्रतिक्रिया

Sachin Tendulkar on Afg Win, काबूल : दिग्गजांना पराभूत करून T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या या कामगिरीने अफगाणिस्तान जल्लोषात न्हाऊन गेला असून आनंद व्यक्त करण्यासाठी लोक रस्त्यावर आले. अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या सुपर एट सामन्यात आठ धावांनी विजय नोंदवत उपांत्य फेरीत धडक मारली. या सामन्यावेळी पावसाचा खेळ सुरू होता. यासोबतच त्याने ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघालाही स्पर्धेतून घरी पाठवले आहे. याआधी त्यांनी ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला होता.

नवीन उल हकने मुस्तफिजुर रहमानला एलबीडब्ल्यू आऊट करताच खोस्त, पक्तिया आणि काबूलमध्ये मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी जमा होऊ लागले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या शहरांची छायाचित्रे X वर पोस्ट केली आहेत. 'आमच्यासाठी यश म्हणजे काय ते पाहा' असे कॅप्शन दिले आहे. दुसऱ्या पोस्टरमध्ये हजारो चाहते रस्त्यावर, त्यांच्या घराच्या बाल्कनीत आणि दुकानांच्या छतावर उत्सव साजरा करताना दिसले. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'T20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या नायकांचा विजय कसा साजरा करायचा हे त्यांना माहीत आहे.'

क्रिकेटच्या देवाने केले अफगाणिस्तानचे अभिनंदन केले

चॅम्पियन फलंदाज सचिन तेंडुलकरने अफगाणिस्तानच्या यशाचे कौतुक करताना लिहिले, 'अफगाणिस्तानने उपांत्य फेरी गाठणे अतुलनीय आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांना पराभूत केले. हा विजय तुमच्या जिद्द आणि मेहनतीचे फळ आहे. तुमच्या प्रगतीचा अभिमान वाटतो. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी याने संघाचे अभिनंदन केले आणि म्हटले, 'किती छान सामना झाला. अफगाणिस्तान संघाचे अभिनंदन.

Afghanistan, your road to the semi-finals has been incredible, overcoming the likes of New Zealand and Australia. Today's win is a testament to your hard work & determination. So proud of your progress. Keep it up! 👏🇦🇫#AFGvBAN #T20WorldCup pic.twitter.com/TDwcGBj0n5

— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 25, 2024 ]]>

माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने लिहिले, 'किती अप्रतिम विजय. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. याला प्रगती म्हणतात. अभिनंदन.' युवराज सिंगने लिहिले, 'उत्तम दृश्य. जबरदस्त विजय. रोमांचक सामना. भावनांचा पूर. पठाण प्रथमच उपांत्य फेरीत. नवीन उल हकची मॅच विनिंग कामगिरी. अतुलनीय क्रिकेट.

आता 27 जून रोजी उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे, ज्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-25T13:26:53Z dg43tfdfdgfd