लॉकी फर्गुसनची ऐतिहासिक कामगिरी; पापुआ न्यू गिनीविरुद्ध सामन्यात केला मोठा विक्रम

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४चा ३९ वा सामना न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात रंगला. त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. या स्पर्धेतून या दोन्ही संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.न्यूझीलंडने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंड जरी या वर्ल्डकप मधून बाहेर पडली असली आणि हा त्यांचा शेवटचा सामना असला तरी शेवट मात्र, न्यूझीलंड संघासाठी गोड झाला. न्यूझीलंडच्या लॉकी फर्गुसनने पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या सामन्यात एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

लॉकीची ऐतिहासिक कामगिरी

न्यूझीलंडविरुद्ध पापुआ न्यू गिनी सामन्यात लॉकी फर्गुसनने त्याच्या कामगिरीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पापुआ न्यू गिनी संघाविरोधात लॉकी फर्गुसनने चार षटके निर्धाव(डॉट बॉल) फेकण्याचा पराक्रम केला आणि तीन विकेटही घेतल्या आहेत. टी-२० क्रिकेटमधील ही सर्वात भेदक गोलंदाजी म्हणून नोंद झाली आहे. कसोटी खेळणाऱ्या देशातील कोणत्याही गोलंदाजाला आतापर्यंत असा पराक्रम करता आलेला नाही त्यामुळे लॉकीच्या नावावर हा नवा रेकॉर्ड नोंद झाला आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये याआधी असा पराक्रम कधीच घडला नसल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे. वर्ल्डकप मध्ये हे असे पहिल्यांदाच घडले असून आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये हे दुसऱ्यांदा घडले आहे तर लॉकी असा पराक्रम गाजवणार दुसरा खेळाडू ठरला आहे. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना एक तास उशिराने सुरू झाला.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर पापुआ न्यू गिनीचा संघ फक्त ७८ धावाच करू शकला.

२० षटकेही फलंदाजी करु शकले नाहीत तर एकाही फलंदाजाला ३० धावसंख्या पार करता आली नाही. केवळ तीन फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला ते म्हणजे नॉर्मन वनुआ ज्याने १४ धावा, चॉर्ल्स अमीनी १७ धावा, सेसे बाऊ १२ धावा करता आल्या.फर्ग्युसनने चॅड सोपरला एक धावा केल्यानंतर लगेच बाद केले तर चार्ल्स अमिनीला १७ धावांवर रोखले आणि कर्णधार असद वाला याला ६ धावांवर बाद केले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-18T03:09:45Z dg43tfdfdgfd