CRICKETER HOUSE: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर; या क्रिकेटरच्या घराची किंमत वाचून येईल चक्कर

मुंबई: एखाद्या क्रिकेटरला जेव्हा खेळात यश प्राप्त होतं त्याच्यासोबत त्याच्या आयुष्यात धन-वैभव पण येतं. आयपीएलनंतर तर खेळाडूंची कमाई ही कोट्यवधींमध्ये होऊ लागली आहे. त्यामुळे अनेक भारतीय क्रिकेट खेळाडू कोट्यधीश बनले आहेत. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, एम एस धोनी हे खेळाडू तर अब्जाधीश आहेतत. यासर्वांमध्ये एक असा खेळाडू आहे जो कधीही आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही, तरी त्याच्या घराची किंमत ही गडगंज श्रीमंत मुकेश अंबानींच्या अँटिलियापेक्षाही जास्त आहे.

देशातील दिग्गज खेळाडू जसे सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली यांची संपत्ती या खेळाडूच्या संपत्तीमुळे अगदी थोडी वाटेल. बडोदा येथील महाराज सिमरजीत सिंह गायकवाड हे एक राजकीय नेते आणि क्रिकेटर आहेत.

रणजी ट्रॉफीमध्ये बडोद्याचं नेतृत्त्व

महाराज सिमरजीत सिंह गायकवाड यांचा जन्म १९६७ मध्ये झाला. ते शालेय जीवनापासूनच क्रिकेट खेळत होते. त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये बडोद्याच्या टीमचं प्रतिनिधघीत्व केलं होतं. त्यांनी १९८७-८८ आणि १९८८-८९ मध्ये सहा फर्स्ट क्लास सामने खेळले. त्यांनी सहा सामन्यांमध्ये १७.०० च्या रनरेटने ११९ धावा केल्या होत्या, यामध्ये एक अर्धशतकही होतं. ६५ हा त्यांचा सर्वोत्तम स्कोअर होता. ते बऱ्याच काळापर्यंत बडोदा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी त्यांची क्रिकेट अकादमी सुरु केली.

महाराज सिमरजीत सिंह गायकवाड यांना वारसा हक्काने २०,००० कोटी रुपयांचं लक्ष्मी विलास पॅलेस मिळालं. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर काकासोबत वारसा हक्कासाठी बराच काळाच्या वादानंतर त्यांना हे पॅलेस मिळालं. या महालाला भारताची सर्वात महागडी प्रॉपर्टी मानलं जातं. मुकेश अंबानींचं घर अँटिलियालाही या महालाने मागे सोडलं. अँटिलियालाची किंमत १५,००० कोटी रुपये आहे.

लक्ष्मी विलास पॅलेस १८९० मध्ये तयार करण्यात आलं होतं. हे बकिंघम पॅलेसपेक्षा चारपट अधिक मोठं आहे. हा महाल ५०० एकरमध्ये पसरलेला आहे. या महालात मोदी बाग पॅलेस आणि महाराजा फतेह सिंह संग्रहालय देखील आहे. या महालात तब्बल १७० खोल्या आहेत. ग्राऊंड फ्लोअर हे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-21T07:31:02Z dg43tfdfdgfd