सेंट लुसिया : सुपर-8 च्या ग्रुप फेरीतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आजचा सामना डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या मैदानाची खेळपट्टी कॅरिबियन बेटांमधील इतर मैदानांपेक्षा थोडी वेगळी आहे. साधारणपणे येथे चेंडू बॅटवर येतो, ही ऑस्ट्रेलियन संघासाठी काहीशी दिलासा देणारी बाब ठरावी. सेंट व्हिन्सेंटच्या सुपर स्लो ट्रॅकवर अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी कांगारूंना खूप त्रास दिला होता. अफगाणिस्तानविरुद्ध मिचेल स्टार्कला वगळून ऑस्ट्रेलियाने डावखुरा फिरकीपटू ॲश्टन अगरला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. अगर अत्यंत किफायतशीर (0/17) असला तरी, अफगाणिस्तान विरोधात पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्याची स्टार्कची क्षमतेचा उपयोग करण्यात कमी पडल्याचे नाकारता येणार नाही. जाणून घेऊया या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची रणनीती काय असू शकते?
Box office. 12.30am AEST tonight.
Full preview of Australia's #T20WorldCup Super Eight crunch clash with India: https://t.co/6JNuvJIHeW pic.twitter.com/D2ot2hvJl7
— cricket.com.au (@cricketcomau) June 24, 2024 ]]>ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, पॅट कमिन्स, मिचेल मार्श, जोश हेझलवूड, ॲडम झम्पा.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-06-24T10:07:52Z dg43tfdfdgfd