TEAM INDIA 2ND SEMI FINAL: एक ही चेंडू न खेळता टीम इंडिया गाठणार थेट फायनल फेरी; सेमीफायनल फेरीत राखीव दिवस नसल्याचा फायदा आता भारताला असा होणार..

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ मधील सेमी फायनल फेरीतील चार संघ आता ठरले असून बांगलादेशविरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव करून महत्वपूर्ण सामन्यात विजयाची नोंद केली. सेमी फायनल फेरीतील सामने गयाना नेशनल स्टेडियमवर रंगणार आहेत. भारतविरुद्ध इंग्लंड सामन्यात जर पाऊस आला तर नेमके समीकरण काय आहे कारण भारताला सेमी फायनलसाठी आता राखीव दिवसही देण्यात आला नाही.

सेमी फायनलमधील भारताची लढत ही इंग्लंडसोबत रंगणार आहे. गयाना नेशनल स्टेडियमवर हा महत्वाचा सामना २७ जूनला वेस्ट इंडिजच्या वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता दिसणार आहे. भारतविरुद्ध इंग्लंड सेमी फायनलमधील सामना जर पावसामुळे वाहून गेला तर पुन्हा खेळवला जाणार नाही कारण या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.

म्हणून राखीव दिवस नाही

भारतविरुद्ध इंग्लंड या सेमी फायनल मधील सामन्यासाठी राखीव दिवस न ठेवण्यामागचे कारण असे की जर राखीव दिवस ठेवला तर सामना २८ जूनला रंगेल. २९ जूनला लगेचच फायनल सामना बार्बाडोसवर खेळवला जाणार आहे. सेमी फायनलचा सामना काही करणस्थव रद्द झाला तर तो २८ जूनला रंगणार मग २९ जूनला लगेचच फायनल यामुळे जो संघ सेमी फायनल फेरीतून फायनलमध्ये पोहोचेल त्याला फायनलच्या तयारीसाठी खूप कमी वेळ मिळणार.

टीम इंडियाला एकही चेंडू न खेळता थेट गाठता येणार फायनल फेरी

भारतविरुद्ध इंग्लंड या सेमीफायनलमधील सामन्यासाठी राखीव दिवस जरी नसला आणि काही करणस्थाव जर सामना रद्द झाला तरही त्याचा फायदा टीम इंडियाला होणार नाही. नेट-रन-रेटमुळे भारत हा सामना न खेळता म्हणजे एकही चेंडू न खेळता थेट फायनल फेरी गाठू शकतो. राखीव दिवस नसल्याने किंवा पावसाची बाधा जरी असली तरीही टीम इंडियाला कुठेच धोका नाही. या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने सगळे सामने जिंकले आहेत त्यामुळे नेट-रन-रेटच्या शर्यतीत टीम इंडिया आघाडीवर आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-25T07:25:55Z dg43tfdfdgfd