WI VS USA: अमेरिकेसाठी धोक्याची घंटा; वेस्ट इंडिजने बाजी पालटली; संघात दमदार खेळाडूची एंट्री

मुंबई: टी-२० वर्ल्डकपमधील सुपर-८च्या फेरीतील सामने आता चांगलेच रंगले आहे. वेस्टइंडिजविरुद्ध अमेरिका सामना बार्बाडोस येथे खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघात एक बदल दिसून येत आहे जो अमेरिकेसाठी भारी पडणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाच्या Playing XI मध्ये काइल मेयर्सचा समावेश झाला आहे.

वेस्ट इंडिजचा सलामीचा फलंदाज ब्रँडन किंग दुखापतीमुळे २०२४च्या टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर पडला. १९ जून रोजी इंग्लंडविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात ब्रँडन जखमी झाला आणि त्याच्याऐवजी डावखुरा फलंदाज काइल मेयर्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, " दुखापतग्रस्त ब्रँडन किंगच्या जागी काइल मेयर्सचा वेस्ट इंडिज संघात समावेश करण्यात आला असून ब्रँडन हा अमेरिकेविरुद्धचा सामना खेळणार आहे. "

अशी झाली ब्रँडनला दुखापत

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ब्रँडन किंगने धडाकेबाज सुरुवात करून केवळ १३ चेंडूत २३ धावा केल्या. या डावात एका षटकाराचाही समावेश होता, जो त्याने तिसऱ्या षटकात रीस टोपलीच्या चेंडूवर १०१ मीटर दूर अंतरावर ठोकला. मात्र १३वा चेंडू खेळताना किंगने सॅम करणच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असताना त्याला गंभीर दुखापत झाली. ब्रँडनची दुखापत गंभीर असल्याने या सामन्यातून तो निवृत्त झाला. या सामन्यात तो निवृत्त झाल्यानंतर शिमरण हेटमायर संघातून खेळताना दिसला.

अमेरिकेसाठी धोका

वेस्ट इंडिजने ब्रँडन किंगच्या जागी अनुभवी आणि स्फोटक सलामीवीर काइल मेयर्सचा टी-२० वर्ल्डकपच्या संघात समावेश केला आहे. ३१ वर्षीय काइल मेयर्सने आतापर्यंत वेस्ट इंडिजकडून १८ कसोटी, २८ एकदिवसीय आणि ३७ टी-२० सामने खेळले आहेत. ब्रँडन कसोटीत ९४९ धावा, एकदिवसीय सामन्यात ६६०धावा आणि टी-२० मध्ये ७२७ धावा केल्या आहेत. ब्रँडन हा वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो त्यामुळे अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात तो अमेरिका संघाला भारी पडण्याची शक्यता आहे. आता वेस्ट इंडिज त्यांचा उर्वरित सामना अँटिग्वामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २३ जूनला खेळणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-22T02:43:27Z dg43tfdfdgfd