क्रिकेटप्रेमी भलताच खुश; रोहितने विकेट काढताच केले अनोखे सेलिब्रेशन; पहा व्हिडीओ

मुंबई:टी-२० वर्ल्डकपचा आता दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार असून या टप्प्यात सुपर-८ मधील दोन गटातले सामने रंगणार आहे. हे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये पार पडणार आहे. या सुपर-८ साठी सात संघाचे स्थान पक्के झाले असून केवळ एका संघासाठी स्थान रिकामी आहे, बांगलादेशविरुद्ध नेपाळ सामन्यात जर बांगलादेशला विजय मिळवता आला तर बांगलादेश सुपर-८ मध्ये प्रवेश करू शकते.या सामन्यात एका गोष्टीने लक्ष वेधले ते म्हणजे नेपाळी क्रिकेट प्रेमीने नेपाळलला विकेट मिळाल्यानंतर केलेले सेलिब्रेशनने.

बांगलादेशविरुद्ध नेपाळ सामना अर्नोस व्हेले या स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बांगलादेशला केवळ १०६ धावांवरच रोखले. बांगलादेशकडून एकाही फलंदाजाला २० धावांचा टप्पा गाठता आला नाही तर नेपाळकडून कर्णधार रोहित पौडेल, संदीप लामिछाने, सोमपाल कामी आणि दीपेंद्र सिंग यांनी दमदार गोलंदाजी केली. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने २ चौकारांसह सर्वाधिक १७ धावा केल्या.

क्रिकेटप्रेमीचे अनोखे सेलिब्रेशन

नेपाळकडून कर्णधार रोहित पौडेलने सहावे षटक फेकले आणि या सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तौहीद हृदयची विकेट काढली. तौहीदची विकेट काढल्यानंतर स्टेडियमवर हजर असलेल्या नेपाळी क्रिकेटप्रेमी खूपच खुश झाला आणि चक्क समोर असलेल्या छोटयाशा पूलमध्ये उडी मारली. नेपाळला विकेट मिळताच हा नेपाळी क्रिकेट चाहता भलताच खुश दिसला आणि हे अनोखे सेलिब्रशन कदाचितच पहिल्यांदा घडले असेल.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

]]>

बांगलादेशसाठी शेवटची संधी

टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर-८ मध्ये आत्तापर्यंत केवळ एकच संघ गट ड मधून पात्र ठरू शकला आहे आणि तो म्हणजे दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेने दमदार कामगिरी करत सुपर-८ मध्ये स्थान मिळवले. बांगलादेशचा संघ नेपाळविरुद्धचा सामना जिंकल्यास सुपर-८ मध्ये पोहोचेल. बांगलादेशने ३ सामने खेळले असून २ जिंकले असल्याने ४ गन सध्या बांग्लादेशकडे आहे. नेपाळ याआधीच सुपर-८ मधून बाहेर पडला आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-17T02:40:57Z dg43tfdfdgfd