गजब बेइज्जती है यार! बाबर आझमने 'या' खेळाडूला म्हटलं 'गेंडा', VIDEO व्हायरल

T20 World Cup 2024 : पाकिस्तान क्रिकेट संघ आणि वाद हा काही नवीन विषय नाही. आता टी20 वर्ल्ड कपच्या आधी नवा निर्माण झाला आहे.  पाकिस्तान (Pakistan) संघाचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) संघातील एका खेळाडूची चक्क प्राण्याशी तुलना केली आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा पहिला सामना 6 जूनला खेळवला जाणार आहे. त्याआधी सराव करताना बाबर आझमकडून बॉडी शेमिंगचा (Body Shaming) हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून क्रिकेट चाहत्यंनी बाबर आझमच्या या वर्तणूकीवर नाराजी व्यक्त केली आहे. 

बाबर आझमचा व्हिडिओ व्हायरल

टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा पहिला सामना यजमान अमेरिकेविरुद्ध रंगणार आहे. यासाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल झाला असून सरावही सुरु केला आहे.  पाकिस्तान संघातील सर्व खेळाडूंनी फुटबॉल सराव केला. या दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, विकेटकिपर आजम खान आणि इतर खेळाडू दिसतायत. व्हिडिओच्या सुरुवातीलाच बाबर आझम विकेटकिपर आजम खानला (Azam Khan) गेंडा म्हणताना ऐकायला मिळतंय. यानंतर सर्व खेळाडू हसायला लागतात. बाबर आणि आझम खानमध्ये मस्करी सुरु असल्याचं यात दिसतंय. 

पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रिया

बाबर आझमने मस्करीत आजम खानला गेंडा म्हटलं असलं तरी अनेक पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांना आजमची प्राण्याशी केलेली तुनला आवडलेली नाही. या व्हिडिओवर चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. काही युजर्सने हा बॉडी शेमिंगचा प्रकार असल्याचं म्हटलंय. आजम खानच्या देहयष्टीवरुन बोलणं चुकीचं असल्याचं काही जणांनी म्हटलं आहे. 

वजनदार खेळाडू

टी20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा आजम खान सध्या चर्चेत आहे तो त्याच्या वजनामुळे. आझम खानचं वजन 110 किलो आहे. पाकिस्तान संघात विकेटकिपर आणि फलंदाज अशी दुहेरी भूमिका तो पार पडतो. टी20 वर्ल्ड कपआधी पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या मालिकेत ढिसाळ विकेटकिपिंगमुळे आजम खान सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला होता.

6 जूनाल पाकिस्तानचा पहिला सामना

पाकिस्तान क्रिकेट संघ 6 जूनला स्पर्धेत सुरुवात करणार आहे. पाकिस्तानचा पहिला सामना यजमान अमेरिकेशी होणार आहे. त्यानंतर 9 जूनला पाकिस्तानचा सामना भारताशी असणार आहे. या हायव्होल्टेज सामन्याची सर्वानाच  प्रतीक्षा आहे.

पाकिस्तान संघ

बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी, उस्मान खान

2024-06-03T15:26:24Z dg43tfdfdgfd