बाबरने तोडला रोहितचा रेकॉर्ड आता विराट आहे रडारवर, इतक्या धावांनी किंग कोहलीचा हा विक्रम तुटणार

मुंबई: आयसीसी टी -२० वर्ल्ड कपच्यासाठी सगळ्या संघानी चांगलीच कंबर कसली आहे. टीम इंडिया सुद्धा आता अमेरिकेच्या दिशेने रवाना झाली आहे. पहिला सामना एक जूनला होणार असून टीम इंडियाचा पहिला सामना पाच जूनला बांगलादेशविरुद्ध रंगणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल ) मधून काही परदेशी खेळाडूंनी खूप आधीच माघार घेतली होती आणि आपल्या मायदेशी परतले होते, यामध्ये इंग्लंडच्या खेळाडूंची संख्या जास्त होती. या टी -२० वर्ल्ड कप आधी पाकिस्तान - इंग्लंडमध्ये टी २० सामना रंगणार असल्याने खेळाडूंनी माघार घेतली होती, असे कारण समोर आले होते. तर आता पाकिस्तान - इंग्लंड यांच्यातील पहिला सामना पाऊसामुळे रद्द झाला, परंतु दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनी फलंदाजी करत १८४ धावांचे लक्ष्य पाकिस्तनला दिले.

रोहितचा रेकॉर्ड तोडला

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने २६ चेंडूत ३२ धावांची खेळी केली आणि यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला मागे सोडले. या यादीत बाबर आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. विराटला मागे टाकण्यात बाबर आता थोडाच दूर आहे.

लवकरच विराटचा रेकॉर्ड तोडणार

टी २० वर्ल्ड कप २०२४ पूर्वी पाकिस्तान संघाला या टी २० मालिकेतील अजून दोन सामने इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहेत, ज्यामध्ये बाबर आझमला विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे. बाबर आझमने आतापर्यंत ११८ टी-२० सामन्यात ४१.१० च्या सरासरीने ३९८७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर तीन शतके आणि ३६ अर्धशतके आहेत.

विराट कोहली अव्व्ल स्थानावर

विराट कोहलीने आतापर्यंत टी २० आयमध्ये ११७ सामने खेळले असून ५१.७५ च्या सरासरीने ४०३७ धावा केल्या आहेत. टी २० आयमध्ये सार्वधिक धावा करण्याचा रेकॉर्ड विराटच्या नावावर आहे तर, बाबर आता विराटचा हा विक्रम तोडण्यापासून केवळ ५१ धावांनी दूर आहे. बाबरला इंग्लंडविरुद्धच्या या टी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये कोहलीचा हा रेकॉर्ड तोडण्याची संधी मिळू शकते.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-26T08:32:45Z dg43tfdfdgfd