विराट कोहलीवर बीसीसीआयची कडक कारवाई, पंचांशी वाद घालणं महागात पडलं

नवी दिल्ली : बीसीसीआयला सर्व खेळाडू सारखे आहेत, जो पंचांशी वाद घालेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, हे आज पुन्हा एकदा पाहायला दाखवून देण्यात आले आहे. कोहली हा एक दिग्गज खेळाडू आहे. पण केकेआरविरुद्धच्या सामन्यात त्याने पंचांशी वाद घातला. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर कडक कारवाई केली आहे. यावेळी विराट कोहलीला चांगलीच अद्दल घडली, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरु होती.

विराट कोहलीने नेमकं काय केलं होतं...

आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामन्यात ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट घडली होती ती तिसऱ्याच षटकात. त्यावेळी केकेआरचा हर्षित राणा हा गोलंदाजी करत होता. विराट कोहलीने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. त्यामुळे कोहली आता मोठी खेळी साकारणार असेल दिसत होते. पण तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ही गोष्ट घडली. कोहलीसमोर राणाने फुलटॉस चेंडू टाकला. कोहली हा चेंडू मारण्यासाठी गेला. पण कोहलीकडून अचूक टायमिंग पाहायला मिळाले नाही. त्यामुळे कोहलीचा झेल उडाला आणि राणानेच तो झेल पकडला. त्यानंतर कोहली चांगलाच भडकला होता. कारण हा चेंडू नो बॉल असल्याचे त्याला वाटत होते. त्यामुळे मैदानातील पंचांनी यावेळी तिसऱ्य पंचांची मदत घेतली होती. कारण तिसरे पंच यावेळी रिप्ले पाहून योग्य निर्णय घेऊ शकतील, असे सर्वांना वाटत होते.

तिसऱ्या पंचांनी यावेळी काय निर्णय दिला...

तिसऱ्या पंचांनी यावेळी रिप्ले पाहायला सुरुवात केली. प्रथम हा चेंडू नॉ बॉल तर नाही ना, हे त्यांनी पाहिले. त्यानंतर यावेळी चेंडू नेमका कोहलीने कुठे मारला आणि चेंडू कुठे होता, हे पंचांनी पाहिले. त्यानुसार तिसऱ्या पंचांनी हा चेंडू नो बॉल नसल्याचे सांगितले. त्यामुळे कोहलीला पंचांनी बाद ठरवले. पण यावेळी कोहली तिसऱ्या पंचांवरही भडकला होता. कोहलीला बाद ठरवल्यावर तो मैदानातील पंचांची वाद घालायला लागला. संपूर्ण क्रिकेट विश्वासमोर कोहली हे कृत्य करत होता आणि त्यामुळे खेळाची प्रतिमा मलीन होत होती. त्यामुळेच त्याच्यावर बीसीसीआयने कारवाई केल्याचे समोर आले आहे.

बीसीसीआयने विराट कोहलीवर कोणती कारवाई केली...

बीसीसीआयने यावेळी विराटवर कडक कारवाई केली आहे. कोहलीच्या मानधनातील तब्बल ५० टक्के रक्कम दंड स्वरुपात कापण्यात येणार आहे. त्यामुळे हा विराट कोहली आणि आरसीबीला मोठा धक्का असणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ESPNcricinfo (@espncricinfo)

]]>

कोणत्याही खेळात पंच महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालणं हे उचित समजलं जात नाही. पण कोहलीने मात्र भर मैदानात सर्वांसमोर पंचांशी वाद घातला आणि आता त्याच्यावर बीसीसीआयने कडक कारवाई केली आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-22T13:33:10Z dg43tfdfdgfd