AFG VS BAN: ओके बाय! ऑस्ट्रेलियाचा गर्व धुळीस, कांगारु स्पर्धेतून आऊट; भावुक झालेला राशिद मोलाचं बोलला

आरोन व्हॅले स्टेडियम: प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहता १९ नोव्हेंबर २०२३ हा दिवस कधीही विसरु शकत नाही. एकीकडे टीम इंडियाच्या खेळाडुंच्या डोळ्यात पाणी होतं. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाचा एक फोटो समोर आला. या फोटोमध्ये कर्णधार मिचेल मार्श दिसत होते. त्यांच्या हातात बियर होती, तर पाय वनडे वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर होते. हे कुठल्याही क्रिकेट चाहत्याच्या पसंतीस पडले नाही. सर्वांचं एकच मत होतं की ऑस्ट्रेलियाला गर्व चढलाय. आता वर्षभरातच त्यांचा गर्व मातीस मिळाला आणि त्यांना फक्त अफगाणिस्तानकडून पराजयचं स्विकारावा लागला नाही तर विश्व चषकातून बाहेरही व्हावं लागलं. तर, भारतने सेमीफायनलमध्ये स्थान मिळवलं.

भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही - राशिद खान

बांगलादेशला धूळ चारत अफगाणिस्तानने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. या विजयानंतर अफगाणिस्तान कर्णधार राशिद खान म्हणाला की, सेमीफायनलमध्ये पोहोचणे आमच्यासाठी स्वप्नासारखं आहे. आम्ही टुर्नामेंटची सुरुवात कशी करतचो यावर हे अवलंबून होतं. आम्हाला आत्मविश्वास तेव्हा आला तेव्हा आम्ही न्यूझीलंडला हरवलं. ही भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे कुठलेही शब्द नाही. आम्हाला सेमीफायनलपर्यंत पोहोचवणारे एकमात्र खेळाडू हे ब्रायन लारा होते. मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला निराश करणार नाही आणि आम्ही हे सिद्ध केले.

आम्हाला वाटलं होतं की आम्ही १३०-१३५ चा स्कोअर करु. पण, आम्ही १५-२० धावांनी मागे पडलो. हे सगळं मानसिकतेवर अवलंबून आहे. १२ षटकात हे लक्ष्य गाठण्यासाठी आम्हाला मेहनत करावी लागेल हे आम्हाला माहिती होतं. इथेच आम्ही चांगलं खेळू शकत होतो. आम्हाला फक्त आपली स्ट्रॅटजी क्लिअर ठेवायची होती. आम्ही प्रयत्न केले कारण आमच्या हातात तेच होतं. सर्वांनी चांगलं काम केलं. टी-२० मध्ये आमच्याकडे मजबूत आधार आहे, विशेषकरुन गोलंदाजीत. ते सगळे अत्यंत चांगले खेळाडू आहेत, अंसही राशिद म्हणाला.

आमचं लक्ष ध्येयाकडे होतं - राशिद खान

पाऊस पडत होता, पण आमचं लक्ष हे आमच्या ध्येयाकडे होतं. आम्हाला १० विकेट घ्यायच्या होत्या. सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा हा एकमात्र चान्स होता. सेमीफायनलमध्ये पोहोचणे खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला सुस्पष्ट मानसिकतेने खेळावं लागेल. या मोठ्या संधीचं सोनं करु हे आम्हाला सुनिश्चित करावं लागेल, अशी प्रतिक्रिया राशिदने दिली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-25T08:26:05Z dg43tfdfdgfd