HARBHAJAN SINGH : पाकिस्तानच्या खेळाडूने मागितली हरभजन सिंगची जाहीर माफी, भारत-पाक सामन्यात काय घडलं जाणून घ्या...

न्यूयॉर्क : पाकिस्ताच्या खेळाडूवर आता हरभजन सिंगवर जाहीर माफी मागण्याची वेळ आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूने एक वक्तव्य केले होते. हे वक्तव्य पाकिस्तानच्या खेळाडूला चांगलेच भोवले आहे. आपली चूक समजल्यावर पाकिस्तानच्या खेळाडूला हरभजन सिंगची जाहीर माफी मागावी लागली आहे.

पाकिस्तानच्या खेळाडूने नेमकं काय म्हटलं होतं, पाहा....

भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यातील १९ वे षटक संपले. त्यानंतर अर्शदीप सिंग हा अखेरचे षटक टाकण्यासाठी सज्ज झाला होता. तेव्हा पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमल म्हणाला की, " या सामन्यात काहीही होऊ शकतं. कारण अर्शदीप सिंग अखेरचे षटक टाकणार आहे. तो चांगल्या लयीत दिसत नाही. आता १२ वाजलेले आहेत." शिख आणि पंजाबी लोकांना '१२ वाजले' या गोष्टीवरून चिडवले जाते. कामरान अकमलने ही गोष्ट डोक्यात ठेवूनच अर्शदीपला डिवचले होते.

हरभजन सिंगने कामरान अकमलचे कान टोचले....

अर्शदीप सिंगचा झालेला अपमान हरभजनला सहन झाला नाही.हरभजनने कामरानचे चांगलेच कान टोचले. हरभजन सिंग म्हणाला की, " कामरान, तु आधी शिखांचा इतिहास जाणून घे. आम्ही शिखांनी तुमच्या माता भगिनींचा अपहरणकर्त्यांपासून बचाव केला होता, तेव्हाही १२ वाजले होते. तुला थोडी तरी लाज वाटली पाहिजे."

कामरान अकमलने कोणत्या शब्दांत मागितली जाहीर माफी पाहा...

हरभजन सिंग भडकल्यावर कामरान अकमलला आपली चूक कळली आणि तो म्हणाला की, " मी जे शिख धर्मीयांबद्दल जे वक्तव्य केले होते, त्याचा मला खेद आहे. मी शिख समुदाय आणि हरभजन सिंग यांची जाहीर माफी मागतो. मी जे वक्तव्य केले ते अयोग्य आणि बेजबाबदार होते. मी यासाठी सर्वांची माफी मागतो."

भारत-पाकिस्तान सामना संपला असला तरी त्याचे पडसाद अजून उमटत आहेत. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध नेहमीच तणावाचे राहीलेले आहेत. त्यामध्ये कामरान अकमलने असं वक्तव्य करत आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला. हरभजनने त्याला चांगलीच समज दिली आणि त्यामुळे त्याने आता शिख समाजाची जाहीर माफी मागितली आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-11T11:19:49Z dg43tfdfdgfd