सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम: यजमान वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० वर्ल्डकपमधील सुपर-८चा शेवटच्या सामना खेळला जात आहे. सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर हा सामना रंगला असून दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजला १३५ वर रोखले. सामन्यात एक भयंकर प्रकार घडला.
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात एक भयंकर प्रकार घडला. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा एक दुःखद अपघात झाला. झेल पकडण्याचा प्रयत्न करत असताना सीमारेषेवर दक्षिण आफ्रिकेच्या दोन खेळाडूंमध्ये जोरदार टक्कर झाली. यानंतर ते दोघेही वेदनेने कळवळू लागल्याने सामनाही काही काळ थांबवावा लागला आणि पंच आणि फिजिओ घाईघाईने सीमारेषेवर पोहोचले.
दक्षिण आफ्रिकेचे दोन वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा आणि मार्को यानसेन लाँग ऑन आणि लाँग ऑफवर चेंडू पकडण्यासाठी सज्ज होते. दोघांनाही वाटले होते की ते चेंडू पकडतील पण या प्रक्रियेत त्यांची टक्कर झाली. दरम्यान रबाडाच्या गुडघ्याला जॅनसेनच्या पोटाला गंभीर दुखापत झाली आणि प्रकृती खराब झाल्यामुळे हे दोघेही मैदानाबाहेर गेले. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ मैदानावर उतरले असून अगदी १५ धावांवर २ बळी गमावलेले असताना मैदानात पाऊस कोसळला. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी वेस्टइंडीजला हा सामना अत्यावश्यक आहे.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-06-24T03:36:44Z dg43tfdfdgfd