AFG VS SA: दारुण पराभव! अफगाणी खेळाडूंचे रन्स की फोन नंबर? फलंदाजांपेक्षा जास्त धावा एक्स्ट्रामधून

मुंबई: टी-२० विश्व चषकात अत्यंत संघर्षानंतर सेमीफायनलपर्यंत पोहोचलेल्या अफगाणिस्तानला सामन्यान मोठा लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. बांगलादेशला हरवून सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या अगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेने चांगलीच धूळ चारली. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाला हरवलं होतं. मात्र, सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तान काही खास कामगिरी करु शकली नाही. अफगाणिस्तानचा संघ या सामन्यात ६० धावाही करु शकली नाही. चोकर्सचा टॅग मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अफगाणिस्तानला ५६ धावांवर सर्वबाद केले. धक्कादायक म्हणजे अफगाणिस्तान संघाचा एकही खेळाडू १० च्या वर धावा करु शकला नाही. या सामन्यात एक्स्ट्रामध्ये अधिक धावा झाल्या.

A bowling performance never before seen in Men's #T20WorldCup knockout action 😲

More as South Africa bowl out Afghanistan inside 12 overs 👇#SAvAFGhttps://t.co/ATc0KXKBNW

— T20 World Cup (@T20WorldCup) June 27, 2024 ]]>

दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान दरम्यान आयसीसी टी-२० विश्व चषक सेमीफायनलमध्ये अत्यंत चुरशीचा सामना होईल अशी अपेक्षा करण्यात आली होती. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने टॉस जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अशा प्रकारे गोलंदाजी केली की आफगाणिस्तान सावरुच शकला नाही.

ओपनिंग जोडीला मैदानात पाय ठेवताच परत पाठवलं

रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम जादरान या ओपनिंग जोडीने ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आणले होते. पण, दक्षिण आफ्रिकेने या जोडीला मैदानात पाय ठेवताच परत पाठवून लावले. कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि मार्को जॅन्सन यांनी ३० धांवांपूर्वीच ६ विकेट घेतल्या. त्यानंतर तबरेज शाम्सीने उत्कृष्ट गोलंदाजी करत विकेट्स घेतल्या.

एकाही खेळाडूने १० च्या वर धावा केल्या नाहीत

अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरोधात अत्यंत लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. अफगाणिस्तानच्या एकाही खेळाडूला १० पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. ११.५ षटकात फक्त ५६ धावा करत संपूर्ण संघ बाद झाला. यामध्ये सर्वाधिक १० धावा या अजमातुल्लाग उमरजई याने केल्या. लाजिरवाणी बाब म्हणजे अफगाणिस्तानच्या फलंदाजांपेक्षा अधिक म्हणजेच १३ धावा या एक्स्ट्रामधून आल्या. ६ धावा या बाय, ६ धावा वाइड बॉल आणि १ धाव ही लेगबायने आले. त्यामुळे आता अफगाणिस्तानच्या संघावर तोंड लपवण्याची वेळ आली आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-27T06:48:25Z dg43tfdfdgfd