KAPIL DEV: रोहितचे भरभरून कौतुक तर विराटला टोमणा;भारतीय माजी कर्णधार कपिल देव यांनी पुन्हा किंग कोहलीवर साधला निशाणा

मुंबई: टी-२० वर्ल्डकपमधील दुसरा सामना हा भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात रंगला. गयाना नेशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता रंगणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो संघ थेट फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकासोबत भिडेल. दक्षिण आफ्रिकाविरुद्व अफगाणिस्तान सामना रंगला असून या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी पलटावली आणि चोकर्स टॅग पुसत सेमीफायनलमध्ये विजय मिळवला. आता टीम इंडिया इंग्लंडसोबत सेमीफायनलमध्ये भिडणार असून त्या पार्श्वभूमीवर आता भारतीय माजी कर्णधार यांनी टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.

एबीपी न्यूजशी बोलताना कपिल देव म्हणाले,"जेव्हा रोहित फलंदाजी करतो तेव्हा तो कोहलीप्रमाणे उडी मारत नाही. रोहितला माहित आहे की त्याला क्रीजवर काय करायचे आहे, रोहितला त्याच्या मर्यादा चांगल्याच माहित आहेत, मला वाटते की या वेळी रोहितपेक्षा चांगला कोणी नाही, संघात अनेक मोठे फलंदाज आहेत जे स्वत:साठी खेळतात पण रोहित तसे करताना दिसला नाही तो वेगळा आहे, रोहित त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहे, तो संघातील खेळाडूंना सोबत घेऊन जातो,संघातील सर्व खेळाडू रोहितवर खूश आहेत त्यामुळेच मला वाटते की हा खेळाडू खरोखरच सर्वोत्तम आहे.”

टीम इंडियासाठी सतत चिंतेचा विषय बनला आहे तो म्हणजे स्टार खेळाडू विराट कोहलीचा फॉर्म. विराट त्याच्या चांगल्या फॉर्ममध्ये अजून या वर्ल्डकपमध्ये तरी अजून दिसला नाही. किंग कोहलीच्या फलंदाजीतून आता सेमी फायनल आणि फायनल फेरीत जर काही धावा झाल्या तर नक्कीच चाहत्यांनासाठी ही वर्णी ठरणार आहे.

भारतीय संघाने टी- २० वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी केली असून संघाने एकही सामना गमावलेला नाही. आता टीम इंडिया वर्ल्डकप जिंकण्यापासून केवळ दोन पाऊले मागे आहे. सेमीमधून फायनलला जाण्यासाठी भारताला इंग्लंडचा पराभव करणे गरजेचे आहे तर पाऊस पडला तर त्याचा फायदा नक्कीच भारताला होईल. पावसामुळे भारताला एकही चेंडू न खेळता थेट फायनलमध्ये प्रवेश मिळू शकतो कारण भारतचा नेट-रन-रेट हा इतर संघाच्या तुलनेत चांगला आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-27T07:18:29Z dg43tfdfdgfd