SHAKIB AL HASAN STATEMENT: वीरेंद्र सेहवाग कोण आहे? शाकिब अल हसनला 'ग'ची बाधा

किंग्सटाउन: टी-20 विश्वचषक 2024 च्या 27 व्या सामन्यात बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन याने किंग्सटाउन, सेंट व्हिन्सेंट येथील अर्नोस वेल ग्राउंडवर नेदरलँड्सविरुद्ध सामना जिंकणारे अर्धशतक झळकावले. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याला माजी भारतीय धडाकेबाज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. वीरूचे चाहते शाकिब अल हसनला प्रचंड ट्रोल करत आहेत.

सेहवागने शाकिबच्या खराब फॉर्ममुळे त्याच्या संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित केले होते आणि त्याने निवृत्ती घ्यायला हवी होती असे म्हटले होते. भारताच्या माजी सलामीवीराने बांगलादेशच्या अष्टपैलू खेळाडूवर फलंदाजीची पुरेशी जबाबदारी न घेतल्याचा आरोपही केला. 37 वर्षीय दिग्गज खेळाडूने नेदरलँड विरुद्ध नाबाद 64 (46 चेंडूत) खेळी करून दीर्घकाळाच्या खराब फॉर्मला मागे टाकून सूर गवसला.

🗣️A lot of questions were raised and criticisms were made based on your previous performances. Specially Virender Shehwag.

Shakib : WHO?😭 pic.twitter.com/GwfJxZIqo8

— Sujoy (@sujoyxx) June 13, 2024 ]]>

आपल्या अर्धशतकानंतर शाकिब म्हणाला की, खेळाडूचे काम कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देणे नसून आपल्या संघासाठी प्रत्येक प्रकारे योगदान देणे असते. जेव्हा त्याला प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने पहिली गोष्ट विचारली - कोण? मग तो म्हणाला- खेळाडू कधीही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला येत नाही. एखाद्या खेळाडूचे काम हे आहे की तो फलंदाज असेल तर संघासाठी फलंदाजी करणे आणि संघासाठी योगदान देणे. जर तो गोलंदाज असेल तर त्याचे काम चांगली गोलंदाजी करणे आहे. विकेट नशिबावर अवलंबून असते. जर तो क्षेत्ररक्षक असेल तर त्याने प्रत्येक धाव वाचवली पाहिजे आणि जास्तीत जास्त झेल घ्यावेत.

आपल्या टीकाकारांबद्दल बोलताना साकिब म्हणाला- कोणाकडेही उत्तर देण्यासारखे काही नाही. मला वाटते की सध्याचा खेळाडू आपल्या संघासाठी किती योगदान देऊ शकतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तो योगदान देऊ शकत नाही, तेव्हा स्वाभाविकपणे चर्चा होईल आणि मला वाटत नाही की ही वाईट गोष्ट आहे. बांगलादेशचा माजी कर्णधार म्हणाला की, त्याच्या संपूर्ण कारकिर्दीतील कामगिरीबद्दल तो कधीही चिंतित झाला नाही आणि त्याने नेहमीच संघासाठी योगदान देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-14T09:15:41Z dg43tfdfdgfd