PAK VS CAN : अखेर बाबरने चूक सुधारली! पाकिस्तान संघात अचानक झाली 'या' मॅचविनर खेळाडूची एन्ट्री

Saim Ayub replaces Iftikhar Ahmed : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचं (Pakistan Cricket) आव्हान आता जवळजवळ संपुष्यात येत असल्याचं पहायला मिळतंय. टीम इंडिया आणि युएसए या दोन्ही संघांकडून लाजीरवाणा पराभव स्विकारल्यानंतर आता पाकिस्तानचा सामना कॅनडाविरुद्ध (PAK vs CAN) होत आहे. या सामन्यात कॅप्टन बाबर आझमने (Babar Azam) मोठी चूक सुधारली. पाकिस्तानने आपला अनुभवी फलंदाज इफ्तिकार अहमद (Iftikhar Ahmed) याला बाहेर बसवून प्लेइंग इलेव्हनमध्ये युवा आणि आक्रमक सॅम आयुबची (Saim Ayub) एन्ट्री केलीये. त्यामुळे आता पाकिस्तानी चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतलाय.

नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॉलिंगमध्ये पाकिस्तानने कोणताही बदल केला नाहीये. भारताविरुद्ध पाकिस्तानने आक्रमक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. आम्हाला मोठ्या मार्जिनने जिंकण्याची गरज आहे, म्हणून आम्ही सॅम आयुबला संघात सामील केलंय, असं बाबर आझमने म्हटलं आहे.

सॅम अयुब पाकिस्तानचं भविष्य

माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू रिकी पाँटिंग याने पाकिस्तानच्या आगामी सुपरस्टार खेळाडूवर भविष्यवाणी केली होती. पाकिस्तानचा सॅम अयुब हा एक फलंदाज आहे जो यावेळी आपल्या खेळाने जागतिक क्रिकेटला चकित करू शकतो, असं पाँटिंगने म्हटलं होतं. मी काही पीएसएल सामने पाहिले आणि मला वाटतं की सॅम अयुब एक महान खेळाडू आहे, तो भविष्यात पाकिस्तानसाठी एक स्टार असेल, असं पाँटिंगने म्हटलं होतं. अशातच आता पाकिस्ताने सॅमला संघात सामील केलंय.

कॅनडा (प्लेइंग इलेव्हन): आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), रविंदरपाल सिंग, साद बिन जफर (कर्णधार), डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी, जेरेमी गॉर्डन.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सॅम अयुब, बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अमीर.

2024-06-11T15:12:12Z dg43tfdfdgfd