SMRITI MANDHANA: सेम टू सेम! विराटच्या गोलंदाजी ॲक्शनसह स्मृतीने केला कहर, घेतली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट

मुंबई: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये वनडे सिरीजचा दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने चार धावांनी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. या सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे स्मृती मानधनाची. टीम इंडियाची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मानधनाने या सामन्यातही शतक झळकावले. मुख्य बाब म्हणजे स्मृतीने गोलंदाजीनेही या सामन्यात विशेष छाप सोडली.

स्मृतीचा गोलंदाजीतही जलवा

भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृतीने या सामन्यात फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही उल्लेखनीय कामगिरी केली. स्मृतीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात तिच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या लुसची विकेट घेत स्मृतीने गोलंदाजीतही आपले खाते उघडले आहे. या सामन्यात स्मृतीने २ षटकात १३ धावा देऊन १ विकेट काढली.

Smriti Mandhana has taken a wicket!!

- The celebrations from Smriti was wholesome. ❤️🇮🇳pic.twitter.com/Z8H9EWkQFe

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 19, 2024 ]]>

विराट कोहलीसारखी हुबेहूब..

स्मृतीने गोलंदाजी करत विशेष पराक्रम तर दाखवलाच पण लक्ष वेधले ते म्हणजे स्मृतीच्या बॉलिंग ॲक्शनने. स्मृतीची बॉलिंग ॲक्शन ही भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीसारखी हुबेहूब असल्याचे दिसले. सध्या सोशल मीडियावर या दोघांचा बॉलिंग ॲक्शनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. स्मृती आणि विराटमध्ये अजून दोन गोष्टीमध्ये साम्य आढळते ते म्हणजे विराटचा जर्सीचा नंबर हा १८ आहे आणि स्मृतीच्या जर्सची नंबरही १८ आहे. आयपीएलमध्ये विराट रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळतो तर स्मृतीही याच टीमकडून खेळते.

Virat Kohli 🤝 Smriti Mandhana.

- The No.18 connection! 😄❤️ pic.twitter.com/SNqw6lgnyC

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 19, 2024 ]]>

बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आव्हान दिले. टीम इंडियाकडून फलंदाजी करताना स्मृती मानधनाने १२० चेंडूंमध्ये १३६ धावा केल्या तर भारताची महिला कर्णधार हरमनप्रीत कौरनेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकले. हरमनने ८८ चेंडूंमध्ये नाबाद १०३ धावा केल्या. टीम इंडियाने ३ विकेट्स गमावून ३२५ धावा केल्या. टीम इंडियाचा विजय झाला आणि भारताने सिरीजमध्ये २-० अशी आघाडी घेतली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-20T07:02:34Z dg43tfdfdgfd