IND VS SA FINAL : माझ्यासाठी वर्ल्ड कप जिंकू नका तर... राहुल द्रविड यांचे फायनलपूर्वी मोठं वक्तव्य, पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली : टी २० वर्ल्ड कप फायनलसाठी आता फक्त काही तासच उरले आहेत. पण फायनल सुरु होण्यापूर्वी आता भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. द्रविड यांचा हा व्हिडिओ जगभरात चांगलाच व्हायरल झाला आहे.

द्रविड यांना फायनलपूर्वी कोणता प्रश्न विचारण्यात आला होता...

राहुल द्रविड यांची फायनलपूर्वी एक खास मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी द्रविड यांना विचारण्यात आले की, "बरीच जणं म्हणत आहेत की, राहुल द्रविड यांच्यासाठी भारताने हा वर्ल्ड कप जिंकायला हवा. याबाबत तुमचं मत काय आहे...." काही दिवसांपासून बऱ्याच दिग्गजांनीही भारताने राहुल द्रविड यांच्यासाठी वर्ल्ड कप जिंकायला हवा, असे म्हटले आहे. कारण द्रविड यांच्यासारख्या महान खेळाडूने एकदाही वर्ल्ड कप आपल्या हातात घेतलेला नाही.

View this post on Instagram

A post shared by Star Sports India (@starsportsindia)

]]>

द्रविड यांनी काय दिले उत्तर, पाहा...

या प्रश्नाला उत्तर देताना द्रविड म्हणाले की, " मी या गोष्टीच्या विरोधात आहे. कारण मी तसा विचार करणारा व्यक्ती नाही. आयुष्यात जी तत्व मी पाळतो, त्यामध्ये ही गोष्ट बसत नाही. कोणासाठी तरी ही गोष्ट करावी, असा माझा विश्वास नाही. कारण एका व्यक्तीसाठी ही गोष्ट करावी, असे मला वाटत नाही. कारण हा एक संघ आहे. त्यामुळे सांघिक भावना महत्वाची आहे. हा वर्ल्ड कप कोणा एकट्यासाठी नाही. वर्ल्ड कप हा जिंकण्यासाठी आहे आणि त्यासाठी चांगले क्रिकेट खेळायला हवे, असे मला वाटते. त्यामुळे कोणा एका व्यक्तीसाठी वर्ल्ड कप जिंकावा, या गोष्टीच्या मी विरोधात आहे. कारण ही गोष्ट मला मान्य नाही. मला या गोष्टीवर अजून जास्त काही बोलायचे नाही. हा विषय इथेच थांबलेला बरा आहे."

द्रविड यांनी वर्ल्ड कप जिंकावा, असे बऱ्याच जणांना वाटत आहे. कारण द्रविड यांचा हा भारताचे प्रशिक्षक म्हणून अखेरचा सामना असेल. कारण या वर्ल्ड कपनंतर द्रविड यांचा भारताच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. गेल्या वर्षी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारत पोहोचला होता. पण त्यावेळी भारतीय संघ पराभूत झाला होता.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-28T17:54:24Z dg43tfdfdgfd