Ravindra Jadeja Retirement: भारताने टी-२० विश्वचषक-२०२४ चे विजेतेपद पटकावताच अनुभवी फलंदाज विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्मानेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. आता या यादीत रवींद्र जडेजाचेही नाव जोडले गेले आहे. जडेजाने रविवारी इंस्टाग्रामवर पोस्ट करून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची माहिती दिली.
निवृत्ती घेतल्यानंतर जडेजाने लिहिले, "पूर्ण अंतःकरणाने कृतज्ञतेने मी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांना अलविदा म्हणतो. अभिमानाने सरपटणाऱ्या अविचल घोड्याप्रमाणे, मी नेहमीच माझ्या देशासाठी आणि इतर फॉरमॅटसाठी माझे सर्वोत्तम दिले आहे. यापुढेही असेच करत राहीन. हे माझ्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान आहे. आठवणी, उत्साह आणि अटूट पाठिंब्याबद्दल धन्यवाद. यासोबतच जडेजाने इतर फॉरमॅटवरही मोठं वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला- मी वनडे आणि कसोटी खेळत राहीन. दरम्यान रवींद्र जडेजा टी-20 विश्वचषक विजेता झाल्यानंतर भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यातही अश्रू आले. त्यांना जल्लोष करण्यासाठी त्यांच्या भाजप आमदार पत्नी रिवाबा जडेजाही स्टेडियममध्ये उपस्थित होत्या.