IND VS SA FINAL : फायनलपूर्वी रोहित शर्माबाबत राहुल द्रविड यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले मी जास्त बोलत नाही पण...

बार्बाडोस : वर्ल्ड कपच्या फायनलला आता फक्त काही तास उरले आहेत. पण त्याचपूर्वी आता भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कर्णधार रोहित शर्माबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य ऐकून चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, द्रविड यांनी फायनलपूर्वी रोहितबाबत असं वक्तव्य का केलं आहे.

रोहित शर्मा संघाचे दमदार नेतृत्व करत आहे.भारतीय संघ आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहीला आहे. गेल्या वर्ल्ड कपमध्येही रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने दमदार कामगिरी केली होती. पण फायनलमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता, तशीच गोष्ट सध्याच्या घडीलाही पाहायला मिळत आहे. भारताने एकामागून एक सामने जिंकले आहेत आणि ते अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पण त्यानंतर द्रविड यांनी रोहितबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.

द्रविड यांनी रोहितबद्दल सांगितले की, " जेव्हा जेव्हा मी कमी पडतो, तेव्हा तेव्हा रोहित हा संघासाठी उभा राहीलेला असल्याचे मी पाहिले आहे. तो एक परीपक्व कर्णधार आहे, त्याच्या रणनितीदेखील फारच उत्तम असतात. त्यामुळे त्याला संघातील खेळाडूंकडून चांगला प्रतिसाद मिळतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो संघातील सर्व खेळाडूंशी संवाद साधतो, तो खेळाडू ११ जणांमध्येआहे की नाही याचा रोहितवर कोणताही परीणाम पडत नाही. रोहित हा सर्वांसाठी सारखाच वागतो. मी जास्त बोलत नाही, कारण रोहित एक खेळाडू, कर्णधार आणि एक व्यक्ती म्हणून फारच चांगला आहे. त्यामुळेच त्याला संघातील खेळाडूंना बांधून ठेवले आहे." रोहित हा एक कर्णधार म्हणून किती चांगला आहे, त्यापेक्षा तो एक व्यक्ती म्हणून कसा आहे हे द्रविड यांनी यावेळी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

रोहितने आयपीएल चांगलीच गाजवली. मुंबई इंडियन्सला त्याने पाच वेळा जेतेपद जिंकवून दिले. त्यानंतर भारताचे कर्णधारपद मिळाल्यावर त्याने खेळाडूंची चांगली मोट बांधली आहे. त्यामुळे आता संघातील खेळाडू हे मुक्तपणे वावरताना दिसतात. एक कर्णधार म्हणून रोहित शर्माचे हे यश मानले जात आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-29T13:27:38Z dg43tfdfdgfd