IND VS SA: पैसा ही पैसा होगा! टी२० वर्ल्ड कप विजेत्यांवर कोट्यवधींचा वर्षाव, रनर अपचं बक्षीसही तोंडात बोट घालायला लावेल

ब्रिजटाउन (बारबाडोस): विश्व चषक २०२४ चा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. आयसीसीने टी२० विश्व चषक २०२४ सुरु होण्यापूर्वीच या स्पर्धेसाठी एकूण ११.२५ मिलियन यूएस डॉलर्सच्या बक्षिसाची घोषणा केली होती. भारतीय चलनानुसार ९३.५ कोटी रुपये. २०२२ च्या तुलनेत प्राइज मनीला जवळपास दुप्पट करण्यात आलं आहे. २०२२ मध्ये ही रक्कम ४६.६ कोटी रुपये होती. यामधून विजेत्या इंग्लंड संघाला १३.३ कोटी रुपये देण्यात आले होते. २०२४ मध्ये विश्व विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला किती पैसे मिळणार जाणून घेऊया.

विजेत्या संघाला किती पैसे मिळणार?

टी-२० विश्व चषकाच्या अंतिम सामन्या भारत आणि द. आफ्रिका एकमेकांविरोधात असतील. यापैकी एक आज विश्वविजेता होणार. विश्व चषक जिंकणाऱ्या संघाला जवळपास २०.४ कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळतील. तर, उपविजेत्या संघाला त्याच्या अर्धे म्हणजेच जवळपास १०.६ कोटी रुपये मिळतील. तर, इतर संघांनाही पैसे दिले जातील. सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या संघालाही मोठी रक्क मिळणार आहे. या दोन्ही संघांना ६ कोटी रुपये मिळणार आहेत.

त्याशिवाय, जे ४ संघ सुपर-८ स्टेजच्या पुढे जाऊ शकले नाहीत, त्यांनाही पैसे दिले जाणार आहेत. त्या संघांना प्रत्येकी ३.१९ कोटी रुपये दिले जाणार आहेत. इतकंच नाही तर ग्रूप स्टेजमध्ये बाहेर पडलेल्या १२ संघांनाही याचा फायदा मिळणार आहे. ग्रूप स्टेजमध्ये आपल्या ग्रूपमध्ये तिसऱ्या स्थानावर राहणाऱ्या प्रत्येक संघाला अडीच कोटी रुपये दिले जातील. तसेच, पॉईंट्सच्या आधारे जे संघ १३ ते २० या स्थानांवर राहिले त्या प्रत्येक संघालाही १.८७ कोटी रुपये दिले जातील.

प्रत्येक संघाला पैसे मिळणार

ICC ने टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये एक सामना जिंकल्यावर संघाला स्वतंत्रपणे २६ लाख रुपये दिले जातील अशी, तरतूद बक्षिसाच्या रकमेत केली आहे. म्हणजेच, जर एखादा संघ या स्पर्धेत फक्त एकच विजय मिळवू शकला, तरी त्याला २६ लाख रुपये मिळतील. तर २ सामने जिंकणाऱ्या संघाला ५२ लाख रुपये दिले जातील.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-29T06:26:28Z dg43tfdfdgfd