SA VS BAN:दक्षिण आफ्रिकाविरुद्ध बांगलादेश सामन्यात धक्कादायक प्रकार; चक्क फलंदाजाने गुडघ्यावर आपटत तोडली बॅट

मुंबई: टी-२० वर्ल्डकपचे २०२४मधील दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी या स्टेडियमवर रंगला. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत सामनाही जिंकला. सामन्यात बांगलादेशच्या एका खेळाडूने केलेल्या कृत्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

जैकरच्या कृत्याची सर्वत्र चर्चा

बांगलादेशची फलंदाजी सुरु असताना १९वे षटक दक्षिण आफ्रिकाकडून ओटनील बार्टमैन याने टाकले. ओटनीलने १९ व्या षटकाच्या शेवटचा चेंडू टाकला आणि चेंडू बाउंस झाल्याने समोर क्रीजवर उभा असलेल्या डाव्या हाताचा फलंदाज जैकर अलीच्या बॅटचे हॅण्डल तुटले आणि नंतर मग जैकरनेच बॅटला गुडघ्यावर आपटत दोन तुकडे केले. जैकर हे कृत्य करतानाचा व्हिडीओ आयसीसीने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे जो सध्या खूप व्हायरल होत आहे.

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध बांगलादेश सामना हा अतिशय अटीतटीचा होता, दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत केवळ ११३ धावाच केल्या.पहिल्याच षटकात तान्झिम सकीबने रीझा हेन्ड्रिक्सला पव्हेलियनचा रास्ता दाखवला तर तिसऱ्या षटकात तान्झिमनेच क्विंटनला डिकॉकची विकेट काढली. बांगलादेशच्या गोलंदाजांनी या सामन्याच्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेला मोठे धक्के दिले. पुढच्या षटकात तास्किन अहमदने आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमला तंबूचा रस्ता दाखवला तर पाठोपाठ युवा ट्रिस्टन स्टब्सही खाते न खोलता परतला.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

]]>

दक्षिण आफ्रिकेची स्थिती २३/४ अशी झाली. यानंतर डेव्हिड मिलर आणि हेनरिच क्लासन यांनी पाचव्या विकेटसाठी ७९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत खेळ सांभाळला. या भागीदारीमुळेच आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. तास्किनने क्लासनला ४६ धावांवर बाद करत ही मिलर आणि त्याची जोडी तोडली. क्लासनची विकेट पडताच लगेच नंतर डेव्हिडनेही २९ धावा करून रिषाद हुसेनच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. दक्षिण आफ्रिकेला ११३ धावांचीच मजल मारता आली तर बांगलादेशकडून तान्झिमने ३ तर तास्किनने २ विकेट्स पटकावल्या.

दक्षिण आफ्रिकेने विजय हिसकावून घेतला

लक्ष्याचा पाठलाग करत बांग्लादेशकडून तांझिड हसनने दोन चौकारांसह आक्रमक सुरुवात केली पण कागिसो रबाडाने त्याला लगेच बाद केलं. केशव महाराजने लिट्टन दासला केवळ नऊ धावाच करू दिल्या आणि त्याला पव्हेलियनचा मार्ग दाखवला. प्रचंड अनुभवी शकीब अल हसनकडून बांगलादेशला मोठ्या अपेक्षा होत्या पण अवघ्या ३ धावा करुन शकीब अँनरिक नॉर्कियाच्या गोलंदाजीवर माघारी परतला तर नॉर्कियानेच कर्णधार नजमूल शंटोलाही १४ धावांवरच रोखले. यानंतर महमदुल्ला आणि तौहिद हृदॉय यांनी पाचव्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. रबाडाने ही भागीदारी तोडत तौहिदला ३७ धावा करून माघारी पाठवले तर जेकर अली केवळ ८ धावच करू शकला. अशा रीतीने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी हा सामना स्वतःच्या दिशेने वळवला आणि ४ धावांनी जिंकला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-11T09:19:30Z dg43tfdfdgfd