T20 WORLD CUP: 'भारताने काही केलं तरी इंग्लंड संघ...', नासीर हुसेनचं मोठं विधान, 'रोहित असो किंवा मग विराट...'

आज भारत आणि इंग्लंडदरम्यान (India vs England) सेमी-फायनल होणार असून याआधी इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार नासीर हुसेनने (Nasser Hussain) मोठं विधान केलं आहे. जर रोहित शर्माने स्फोटक सुरुवात केली किंवा विराट कोहलीने (Virat Kohli) खराब फॉर्मवर मात करत चांगली कामगिरी केली तरी इंग्लंड संघ घाबरणार नाही असा विश्वास नासीर हुसेनने व्यक्त केला आहे. मागील वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. यावेळी जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी रेकॉर्डब्रेक पार्टनरशिप केली होती. यानंतर अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत वर्ल्डकप जिंकला होता.

मागील वर्ल्डकपनंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ पॉवरप्लेमध्ये आक्रमक खेळी करतो. त्यांनी आता पुराणमतवादी दृष्टीकोन बदलला आहे, ज्यामुळे ॲडलेडमधील उपांत्य फेरीत त्यांचा पराभव झाला. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरोधात केलेली आक्रमक खेळी आणि ऋषभ पंतची फलंदाजी यांनी हे सिद्ध केलं आहे. 

दरम्यान नासीर हुसेनने इंग्लंड संघ भारताचा सामना करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. "जर रोहित शर्माने चांगली सुरुवात केली किंवा फॉर्ममध्ये नसणाऱ्या विराट कोहलीने खेळी केली तरी इंग्लंड संघाला काही त्रास होणार नाही. भारताने इंग्लंडसमोर कोणतंही आव्हान केलं तरी इंग्लंड संघ घाबरणार नाही. यामुळेच इंग्लंड संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्यांनाही जिंकण्यासाठी आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे".

टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची हवी तशी परिक्षा झाली नसल्याने ही गोष्ट इंग्लंड संघाच्या बाजूने जाईल असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. "या वर्ल्डकपमध्ये फक्त पाकिस्तान संघाने भारताची परीक्षा घेतली आहे. त्यांच्यासमोर आतापर्यंत फक्त स्पर्धेत टिकून राहण्याचं आव्हान होतं", असं त्याने सांगितलं.

भारत जगातील सर्वोत्तम संघापैकी आहे. मात्र गेल्या 11 वर्षात भारताने एकही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. 2013 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी ही जिंकलेली शेवटची आयसीसी स्पर्धा आहे. 

"हे विसरू नका की ते बऱ्याच काळापासून त्यांचा आक्रमक खेळण्याचा दृष्टिकोन आहे. भारताने उशीराने आक्रमक खेळी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. तो एक धोकादायक संघ आहे. पण अफाट प्रतिभा असतानाही ते मोबदला मिळवू शकलेले नाहीत," असं तो म्हणाला आहे.

2024-06-27T10:11:27Z dg43tfdfdgfd