WI VS NZ: वेस्टइंडिजचा दमदार विजयासह सुपर-८ मध्ये प्रवेश; तर पराभवासह न्यूझीलंड वर्ल्डकपमधून आऊट

मुंबई : टी-२० वर्ल्डकप मधील क गटातील सामना वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड संघामध्ये ब्रायन लारा स्टेडियमवर रंगला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर वेस्ट इंडिजने प्रतहाम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर १५० धावांचे आव्हान उभे केले. लक्ष्याची प्राप्ती करत न्यूझीलंड केवळ १३६ धावाच करू शकला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडचा पराभव करत सलग तिसरा सामना जिंकून सुपर-८ मध्ये आपले स्थान मिळवले आहे. न्यूझीलंड संघ या पराभवासह वर्ल्डकपच्या बाहेर पडला आहे.

त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध वेस्ट इंडिज सामना रंगला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ९ बाद १४९ धावा केल्या. मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक मारा सुरु ठेवत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना थोड्या थोड्या धावांनी मैदानातून माघारी जाण्यास मजबूर केले. वेस्टइंडीज सामना सुरु झाल्यावर ३० धावांवर ५ विकेट अशा परिस्थितीत होती परंतु शेरफेन रदरफोर्डने शानदार खेळी करत सर्वाधिक ३९ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या.

न्यूझीलंड संघाची निराशाजनक कामगिरी

लक्ष्याचा पाठलाग करत मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला फारशी चांगलीच सुरुवात करता आली नाही. डेव्हॉन कॉनवे आणि फिन ऍलन यांनी पहिल्या विकेटसाठी २० धावांची भागीदारी केली तर कॉनवेने ८ चेंडूत केवळ ५ धावा केल्या आणि बळी गमावला. यानंतर सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर फिन ऍलनच्या रूपाने संघाला दुसरा धक्का बसला. ॲलनने २३ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २६ धावा केल्या. सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कर्णधार केन विल्यमसनच्या रूपाने तिसरी विकेट पडली तो केवळ १ धावा करू शकला.

नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रचिन रवींद्र १० धावा करून बाद झाला. मिचेल १२ धाव करून पव्हेलियनकडे परतला तर नीशम १० धावा करून माघारी परतला. १८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सच्या रूपाने संघाला ७वा धक्का बसला तर फिलिप्सने सार्वधिक ४० धावांची खेळी केली आणि पुढच्या चेंडूवर टीम साऊथी गोल्डन डकवर पव्हेलियनमध्ये परतला. ट्रेंट बोल्टने ७ धावा केल्या आणि पव्हेलियन गाठले अखेरीस, मिचेल सँटनरने नाबाद २१ धावा केल्या.अशाप्रकारे न्यूझीलंड संघ लक्ष्यप्राप्ती करू शकला नाही आणि केवळ १३६ धावांवरच सर्वबाद सर्वबाद झाला.

वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा पराक्रम

वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने १९ धावा देत सर्वाधिक ४ बळी घेतले. याशिवाय फिरकीपटू गुडकेश मोतीने ३ विकेट्स घेतल्या. उर्वरित १-१ बळी अकिल हुसेन आणि आंद्रे रसेल यांनी काढले. गोलंदाजच्या पराक्रमुळे वेस्ट इंडिज संघ सलग तिसरा सामना जिंकले आणि थेट सुपर-८मध्ये दमदार एंट्री मिळवली. या पराभवासह न्यूझीलंड संघ वर्ल्डकपच्या बाहेर पडला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-13T05:26:33Z dg43tfdfdgfd