चेन्नईच्या पराभवानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नेमका काय झाला बदल, कोणता संघ कोणत्या स्थानावर पाहा

चेन्नई : चेन्नईला आपल्या घरच्या मैदानातच पराभव पत्करावा लागला. पंजाबने चेन्नईवर सहजपणे विजय साकारला आणि आपण प्ले ऑफच्या शर्यतीत कायम असल्याचे दाखवून दिले. कारण या सामन्यात चेन्नईच्या पराभवानंतर पॉइंट्स टेबलमध्ये बदल झाल्याचे समोर आले आहे. विजयानंतर पंजाबने कितव्या स्थानावर झेप घेतली आहे आणि पराभवानंतर चेन्नईचा संघ कितव्या स्थानावर पोहोचला आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.

पंजाबच्या संघाने यापूर्वी ९ सामने खेळले होते. या ९ सामन्यांमध्ये पंजाबच्या संघाला ६ पराभव पत्करावे लागले होते, तर त्यांना फक्त तीन विजय मिळवता आले होते. या तीन विजयांसह पंजाबच्या संघाचे ६ गुण झाले होते. या सहा गुणांसह पंजाबचा संघ हा आठव्या स्थानावर होता. त्यामुळे विजयासह पंजाबचा संघ कितव्या स्थानावर जातो, याची उत्सुकता सर्वांना होती. पंजाबने आपल्या १० व्या सामन्यात विजय साकारला. पंजाबचा हा १० व्या सामन्यातील चौथा विजय ठरला. त्यामुळे या चौथ्या विजयानंतर पंजाबचे ८ गुण झाले आहेत. या आठ गुणांसह पंजाबच्या संघाने गुजरात टायटन्सला मागे टाकत सातवे स्थान पटकावले आहे.

चेन्नईच्या संघाने या सामन्यापूर्वी ९ सामने खेळले होते. या ९ सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाने पाच विजय मिळवले होते, तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. या पाच विजयांसह चेन्नईच्या संघाचे १० गुण झाले होते. त्यामळे चेन्नईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता. या सामन्यात विजय मिळवत चेन्नईच्या संघाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर जाण्याची संधी होती. पण पराभवाने चेन्नईच्या संघाची गुणतालिकेत घसरणही होऊ शकत होती. चेन्नईचा हा १०व्या सामन्यातील पाचवा पराभव ठरला. पण या पराभवानंतर मात्र त्यांचे स्थान कायम राहीले. त्यामुळे या पराभवानंतरही ते चौथ्या स्थानावर कायम आहेत.

पराभवानंतरही चेन्नईचे चौथे स्थान कायम असले तरी त्यांचा नेट रनरेट मात्र कमी झाला आहे. या गोष्टीचा फटका त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत बसू शकतो.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-01T18:48:26Z dg43tfdfdgfd