टी-२० वर्ल्ड कपपूर्वी सर्वांनाच मोठा धक्का, श्रीलंकेला चक्क नेदरलँड्सने केले पराभूत

लॉडरहिल: टी-२० वर्ल्ड कपपूर्वीच आता सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वीच आता नेदरलँड्सच्या संघाने श्रीलंकेला मोठा धक्का दिला आहे.

नेदरलँडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावत १८२ धावांचे आव्हान श्रीलंकेसमोर ठेवले. या लक्षाचा पाठलाग करत श्रीलंका लवकर लक्ष गाठेल, असे वाटले होते. मात्र हे लक्ष गाठता गाठता श्रीलंकेच्या नाकी नऊ झाले. श्रीलंकेच्या फलंदाजांना नेदरलँडच्या गोलंदाजीला सामोरे जाता आले नाही. श्रीलंकेच्या संघाने मात्र १८.५ षटकात हार मानली. त्यांना अवघ्या १६१ धावा करत परतावे लागले. तर नेदरलँडने २० धावांनी श्रीलंकेचा पराभव केला.

टी-२० विश्वचषक २०२४ च्या पर्वाच एकूण २० संघ सहभागी झाले आहेत. तर लवकरच सामन्यांची सुरूवात होणार आहे. हे २० संघ सध्या जोरदार सराव करत आहेत. नेदरलँडविरूद्ध श्रीलंका या एका सराव सामन्यात श्रीलंकेच पारडं जड असल्याचे सर्वांनाच वाटत असताना नेदरलँडच्या संघाने बाजी मारली.

स्पर्धेचं नववं पर्व १ जूनपासून सुरु होणार आहे. संघांचे एकूण चार गट असून प्रत्येक गटात पाच संघ आहेत. प्रत्येक गटातील दोन संघ सुपर ८ च्या फेरीत स्थान मिळवतील. याचसाठी झालेल्या श्रीलंकाविरूद्ध नेडरलँडच्या सामन्यात कमकुवत वाटणाऱ्या नेदरलँडने श्रीलंकेला पराभवाचं पाणी पाजलं. सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत नेदरलँडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रीत केले. मात्र हा निर्णय श्रीलंकेसाठी योग्य ठरला नाही. नेदरलँडच्या प्रभावी गोलंदाजीपुढे श्रीलंकेने हार मानली.

श्रीलंका : वानिंदु हसरंगा (कर्णधार), चॅरिथ असलांका (उपकर्णधार), कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदु मेंडिस, सदीरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजय डी सिल्वा, महेश थीक्षाना, डुनिथ वेलालेज, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा, मथीशा पथिराना, दिलशान मदुशंका.

नीदरलँड्स: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), आर्यन दत्त, बास डी लीडे, डेनियल डोरम, फ्रेड क्लासेन, काइल क्लेन, लोगन वान बीक, मॅक्स ओ’डोव्ड, माइकल लेविट, पॉल वॅन मीकेरेन, साइब्राँड अँगेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, ⁠⁠टिम प्रिंगल, विक्रम सिंह, विव किंग्मा, वेस्ले बर्रेसी.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-29T16:00:43Z dg43tfdfdgfd