ठरलं तर मग.. गौतम गंभीर 'या' दिवशी सांभाळणार प्रशिक्षकपदाचा कार्यभार; बीसीसीआयने सांगितला मुहूर्त

मुंबई: टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रशिक्षकपदाची धुरा भारतीय माजी कर्णधार राहुल द्रविड संभाळत आहेत.लवकरच द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार असून आता प्रशिक्षकपदासाठी नवीन उमेदवार बीसीसीआय लवकरच नेमणूक करणार आहेत.प्रशिक्षकपदासाठी अनेक माजी भारतीय खेळाडूंची नवे समोर आली होती त्यात आघाडीवर माजी भारतीय खेळाडू गौतम गंभीर यांच्या नावाची चर्चा जोरदार रंगली असताना जूनच्या अखेर पर्यंत बीसीसीआय गौतम यांच्या नावावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करेल असे समोर आले.

लवकरच गंभीर यांच्या नावाची घोषणा

दैनिक जागरणमधील एका वृत्ताप्रमाणे, "गंभीर आणि बीसीसीआय यांच्यात प्रशिक्षक पदाच्या घोषणेच्या तारखेबद्दल आधीच चर्चा झाली आहे, बीसीसीआयच्या एका स्रोताने उघड केले आहे, जे सध्या चालू असलेल्या टी-२० वर्ल्डकपच्या भारताच्या मोहिमेवर अवलंबून आहे, गंभीरने पुढे बोर्डाला सांगितले की, त्याला त्याच्या स्वतःच्या सपोर्ट स्टाफ सदस्यांची निवड करायची आहे, सध्या विक्रम राठौर हे फलंदाजी प्रशिक्षक, पारस म्हांबरे गोलंदाजी प्रशिक्षक आणि टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत.

गंभीर घेणार महत्त्वपूर्ण निर्णय

उल्लेखनीय म्हणजे, जेव्हा रवी शास्त्री हे भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते तेव्हा राठौर यांची संजय बांगर यांच्याजागी नियुक्ती केली होती. द्रविड यांची प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर त्यांनी शास्त्री यांच्याच निर्णय पुढे कायम ठेवला आणि राठौर यांनाच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड केली. म्हांबरे आणि दिलीप यांना राठौर यांच्या विंनतीने कार्यरत ठेवले. गंभीरने प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारल्यानंतर भारतीय संघ, राठौर, म्हांबरे आणि दिलीप यांच्या संभाव्य बदलीसह सपोर्ट स्टाफ युनिटमध्ये महत्त्वपूर्ण बदल पहायला मिळणार आहे.

भारतीय संघ सध्या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत असून सुपर-८ मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे तर भारतीय संघाले तीन सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे कॅनडाविरुद्धचा सामना वाहून गेला. भारतीय गोलंदाजानी या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी सादर केली असून भारताच्या प्रमुख फलंदाजांना चमकदार कामगिरी करता आली नाही.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-16T09:38:25Z dg43tfdfdgfd