'थोडी लाज वाटू दे, तुमच्या आयाबहिणींची इज्जत...', कामरान अकमलच्या वादग्रस्त वक्तव्यावर भडकला हरभजन सिंग

Harbhajan Singh Slam Kamraan Akmal Statement : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये (Pakistan Cricket) सुरू असलेल्या वादामुळे काही खेळाडू वायफळ बडबड करत असल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानचे माजी खेळाडूंना किक्रेट बोर्डातील पदाची महत्त्वकांक्षा असल्याने अनेक खेळाडू वादग्रस्त वक्तव्य करताना दिसल आहेत. अशातच भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्यावेळी कामरान अकमल (Kamraan Akmal) याने लाईव्ह शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अकमल याने अर्शदीपवर बोलत असताना शिख समाजाचा अपमान केला होता. त्यामुळे क्रिडाविश्वातून अकमलवर जोरदार टीका होताना दिसली होती. अशातच आता हरभजन सिंग (Harbhajan Singh) अकमलवर चांगलाच भडकल्याचं पहायला मिळतंय.

Harbhajan Singh काय म्हणाला?

सोशल मीडियावर कामरान अकमल याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कामरानवर टीका केली. अशातच हरभजन सिंग याने देखील पोस्ट करत अकमलला चांगलंच झापलं. तुला लाज वाटली पाहिजे... कामरान अकमल, तुझं घाणेरडं तोंड उघडण्यापूर्वी शिखांचा इतिहास जाणून घे. आम्ही शिखांनी तुमच्या आई बहिणींना अपहरणकर्त्यांपासून वाचवलं... तेव्हा 12 वाजले होते. स्वतःची लाज वाटली पाहिजे आणि थोडी कृतज्ञता दाखव, असं हरभजन सिंग म्हणाला आहे.

Kamraan Akhmal काय म्हणाला होता?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू असताना रोहित शर्माने 19 वी ओव्हर जसप्रीत बुमराहला दिली. त्यावेळी अर्शदीप 20 वी ओव्हर घेऊन येणार होता. तोच सामना निर्णायक ठरणारा होता. सामन्यावेळी अर्शदीप सिंहला शेवटची ओव्हर टाकायची आहे. तसा तो फॉर्ममध्ये दिसत नाही. तुम्हाला माहित आहे 12 वाजले आहेत. त्यामुळे एका शिखाला ओव्हर देऊ नये, असं अकमल आणि त्याच्या साथीदारने म्हटलं होतं. त्यामुळे मोठा वाद उभा राहिला होता.

अकमलने मागितली माफी

दरम्यान, माझ्या अलीकडील टिप्पण्यांबद्दल मला मनापासून खेद वाटतो आणि मनापासून माफी मागतो. हरभजन सिंग आणि शीख समुदाय यांची माफी मागतो. माझे शब्द अयोग्य आणि अनादर करणारे होते. मला जगभरातील शीख लोकांबद्दल अत्यंत आदर आहे आणि कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही. मला खरच माफ करा, असं म्हणत कामरान अकमल याने माफी मागितली आहे.

2024-06-11T10:26:24Z dg43tfdfdgfd