धोनीचा सल्लाही नशीब बदलू शकला नाही, ऋतुराज गायकवाडच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड याचे नशीब फारच खराब झाले आहे. त्याने आता पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकही गमावली आहे. ही ११ सामन्यांमध्ये १०वी वेळ आहे. जेव्हा त्याला फलंदाजी किंवा गोलंदाजी यापैकी निवड करण्याची संधी मिळाली नाही. रविवारी खेळल्या गेलेल्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात गायकवाडने नाणेफेक गमावली. ज्यामध्ये चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. याआधी गायकवाडने आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध फक्त नाणेफेक जिंकली होती. ज्यामध्ये त्यांच्या संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला होता.

सीएसकेचा कर्णधार गायकवाड याने आतापर्यंतच्या मोसमात ११ पैकी १० नाणेफेक गमावली आहेत. १० वेळा नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईने परिस्थितीचा फायदा घेत ४ वेळा विजय मिळवला. गायकवाड आता आयपीएल २०२४ मध्ये सलग सहावी नाणेफेक गमावली. हे देखील आश्चर्यकारक आहे. ऋतुराज गायकवाड सतत नाणेफेक हरत असेल, पण प्रत्येक सामन्यात त्याची वैयक्तिक कामगिरी चांगली होत आहे. रविवारी पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी गायकवाडने आयपीएल २०२४ मध्ये ५०९ धावा केल्या आहेत.

दरम्यान नाणेफेक गमावल्यानंतर गायकवाड म्हणाला, “आम्ही आमच्या प्रक्रियेनुसार खेळणार आहोत. छोट्या छोट्या गोष्टी बरोबर करण्याचा प्रयत्न करतो. विरोधी संघाच्या ट्रॅक रेकॉर्डचा आम्ही फारसा विचार करत नाही. आम्ही आमच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करत आहोत. या मोसमात आम्हाला खूप दुखापतींना सामोरे जावे लागले. आम्हाला आमच्या संघात काही बदल करावे लागले. नाणेफेक हरल्याबद्दल मी एवढेच म्हणेन की मी १० नाणेफेक गमावली आहे, पण ५ सामने जिंकले आहेत. ही सकारात्मक बाब आहे. आम्ही संघात बदल केला आहे. फिझच्या जागी सँटनरने संघात स्थान दिले आहे.

एकाच मोसमात सर्वाधिक वेळा नाणेफेक गमावण्याचा विक्रम संजू सॅमसनच्या नावावर आहे. २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असताना सॅमसनने १३ वेळा नाणेफेक गमावली होती. तर २०१२ मध्ये एमएस धोनीने १२ वेळा नाणेफेक गमावली होती. आता गायकवाडही या यादीत अव्वल येण्याच्या जवळ येत आहेत. या मोसमात त्यांने १० नाणेफेक गमावली आहेत. यानंतर सीएसकेचे लीग टप्प्यात ३ सामने शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वाधिक नाणेफेक गमावण्याच्या बाबतीत गायकवाड संजू सॅमसनच्या लाजिरवाण्या विक्रमाची बरोबरी करू शकतो.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-05T12:02:56Z dg43tfdfdgfd