मुंबई इंडियन्सचा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर पण कोणाला मिळाली एंट्री जाणून घ्या...

मुंबई: मुंबई इंडियन्सचा खेळाडू विष्णू विनोद हाताच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. गुरुवारी मुंबई इंडियन्सने आरसीबीच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाने ही माहिती सर्वांना दिली. पण आता विनोदच्या जागी एक नवा हिरा मुंबईच्या संघात दाखल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

]]>

विनोद आता मुंबईच्या संघाकडून या संपूर्ण हंगामात खेळणार नाही. विनोदच्या जागी आता मुंबई इंडियन्सच्या संघाने सौराष्ट्राचा यष्टीरक्षक व फलंदाज हार्विक देसाईला संघात स्थान दिले आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि विविध संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. हार्विक देसाईने २६ फेब्रुवारी २०१७ रोजी विजय हजारे ट्रॉफी दरम्यान सौराष्ट्रासाठीमध्ये पदार्पण केले. त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे त्याला फलंदाज व विकेटकीपर म्हणून ओळख मिळाली. १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये हार्विकने ापली चमक दाखवली होती. त्यामुळेच हार्विक प्रकाशझोतात आला होता.

हार्विकने ४६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि ३३.६४ च्या सरासरीने २६५८ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर पाच शतके आणि १६ अर्धशतके आहेत. एवढेच नाही तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ४० सामन्यानमध्ये ३५.२८ च्या बॅटिंग सरासरीने १३४१ धावा जमवल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये हार्विकची चार शतके आणि नऊ अर्धशतके आहेत. त्याच्या टी-२० रेकॉर्डमध्ये २७ सामने समाविष्ट आहेत, जिथे त्याने ३०.०४ च्या सरासरीने ६९१ धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि चार अर्धशतके आहेत.

२४ वर्षीय हार्विक २०१८ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा तो सदस्य होता. त्यानंतर आता हार्विक मुंबई इंडियन्सच्या संघात दिसत आहे. हार्विक मुंबई इंडियन्ससाठी कशी कामगिरी, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. गुरुवारी मुंबईच्या वानखेडेमध्ये मुंबई आणि आरसीबीमध्ये आयपीएल २०२४ चा २५ वा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सचा हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर नक्कीचअसतील.

मुंबई ४ गुणांसोबत गुणतालिकेत ८ व्या स्थानावर आहे. मुंबईसाठीच नाही तर आरसीबी या दोन्ही संघासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे. या सामन्यात चाहत्यांचा नजरा रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन खेळाडूंवर टिकून असतील.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-11T14:16:43Z dg43tfdfdgfd