हार्दिकने मलिंगाचा पुन्हा केला अपमान, व्हिडिओमध्ये पाहा पंड्या नेमका कसा वागला

मुंबई : हार्दिक पंड्याचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न आता चाहते विचारत आहेत. कारण आता तिसऱ्यांदा हार्दिकने संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगाचा अपमान केला आहे. हार्दिकचा हा व्हिडिओ आता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये व्हायरल झाला आहे.

हार्दिकने मलिंगाचा केलेला पहिला अपमान

यापूर्वी मुंबई इंडियन्सचा सामना संपल्यावर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत होते. त्यावेळी लसिथ मलिंगा हा हार्दिकच्या समोर आला. त्यावेळी मलिंगा हार्दिकश हात मिळवण्यासाठी गेला, पण हार्दिकने त्याला नकार दिल्याचे पाहायला मिळाले.

हार्दिकने मलिंगाचा केला दुसऱ्यांदा अपमान...

मुंबई इंडियन्सचा संघ फलंदाजी करत असताना हार्दिक हा डगआऊटच्या इथे उभा होता. तिथेच मलिंगा आणि कायरन पोलार्ड बसले होते. यावेळी हार्दिकचा आर्विभाव असा होता की, मी कर्णधार आहे आणि मला कोणीतरी जागा द्यायला हवी. त्यामुळे पोलार्ड हा उठून जायला तयार होता. पण हार्दिक मलिंगाकडे पाहत होता. त्यावेळी मलिंगा तिथून उठून गेल्याचे पाहायला मिळाले.

हार्दिकने आता केलं तरी काय पाहा व्हिडिओ...

राजस्थानविरुद्ध मुंबई इंडयन्सचा सामना झाला. हा हार्दिक पंड्याचा १०० वा सामना होता. त्यामुळे मलिंगा त्याला खास जर्सी देत होता. यावेळी सर्व खेळाडूंना टाळ्या वाजवल्या. त्यानंतर मलिंगा हार्दिकला मिठी मारायला गेला, पण हार्दिकने त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष केले. त्याने हे खास टी शर्ट दुसऱ्या खेळाडूकडे दिले आणि मलिंगाचा पुन्हा एकदा अपमान केला.

यशस्वी जयस्वालच्या शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने मुंबई इंडियन्सवर नऊ विकेटनी विजय मिळवला. राजस्थानने मुंबईला ९ बाद १७९ धावांत रोखले. यानंतर राजस्थानने विजयी लक्ष्य १८.४ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह राजस्थानने अव्वल स्थान आणखी भक्कम केले. 'वानखेडे'वर झालेल्या लढतीतही राजस्थानने मुंबईला नमविले होते. या पराभवानंतर हार्दिक निराश झाला होता.

सवाई मानसिंह स्टेडियममध्ये ही लढत झाली. लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी आणि जोस बटलरने पॉवरप्लेच्या सहा षटकांत बिनबाद ६१ धावा केल्या होत्या. यानंतर पावसाची एक सर आली. त्यामुळे काही वेळ खेळ थांबवण्यात आला. पाऊस थांबल्यानंतर खेळ सुरू झाल्यावर जोस बटलर बाद झाला. पीयूष चावलाने त्याचा त्रिफळा उडविला. बटलरने २५ चेंडूंत सहा चौकारांसह ३५ धावा केल्या. यशस्वीने ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर त्याला वढेराने जीवदान दिले. यानंतर यशस्वी-संजू सॅमसनने मुंबईच्या गोलंदाजांना संधीच दिली नाही. या जोडीने ६५ चेंडूंत १०९ धावांची अभेद्य भागीदारी रचली. यशस्वीने ६० चेंडूंत नऊ चौकार व सात षटकारांसह नाबाद १०४, तर संजूने २८ चेंडूंत नाबाद ३८ धावा केल्या.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-23T13:21:40Z dg43tfdfdgfd