IND VS AFG : ... जर तुम्ही फायनल जिंकलात तर, ड्वेन ब्राव्होने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना दिलं वचन

सेंट लुशिया : अफगाणिस्तानने इतिहास रचला. प्रथमच ते सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत. पण जर अफगाणिस्तानने फायनल जिंकली तर त्यांना ड्वेन ब्रावो त्यांच्यासाठी एक खास गोष्ट करणार असल्याचे आता समोर आले आहे. या गोष्टीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

]]>

आता तुम्ही विचार करत असाल की, अफगाणिस्तान आणि ड्वे ब्राव्हो यांचा काय संबंध आहे. तर ब्राव्हो हा अफगाणिस्तानच्या संघाचा सहाय्यक प्रशिक्षक आहे. ब्राव्होने आतापर्यंत वेस्ट इंडिजला वर्ल्ड कप जिंकवण्यात मोलाची मदत केली होती. त्याचबरोबर आयपीएलमध्येही त्याने चेन्नईकडून खेळताना नेत्रदीपक कामगिरी केली आणि ट्रॉफी जिंकण्याचा महत्वाची भूमिका बजावली होती. आता अफगाणिस्तानला वर्ल्ड कप जिंकवून देण्यातही ब्राव्हो हा मोलाची भूमिका बजावत आहे. पण आता जर अफगाणिस्तानने वर्ल्ड कप जिंकला तर त्यांच्यासाठी ब्राव्हो आता एक खास गोष्ट करणार आहे.

वेस्ट इंडिजने जेव्हा टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हा ब्राव्होने चॅम्पियन्स... चॅम्पियन्स हे खास गाणं बनवलं होतं आणि त्याच्यावर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी डान्स केला होता. पण त्यानंतर आता ब्राव्होने अफगाणिस्तानच्या संघाला एक वचन दिले आहे. अफगाणिस्तानच्या संघाने जर टी-२० वर्ल्ड कप जिंकला तर त्यांच्यासाठी आपण खास चॅम्पियन्स... चॅम्पियन्स गाण्याचा रिमेक बनवणार असल्याचे ब्राव्होने सांगितले आहे. या गाण्याचा रिमेक कसा असेल, हे ब्राव्होने यावेळी दाखवले आहे. ब्राव्होचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

अफगाणिस्तानने बांगलादेशला धुळ चारली आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कपबाहेर काढले. अफगाणिस्तानने बांगलादेशला पराभूत केले, यापेक्षा ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप बाहेर काढले, याचा आनंद जास्त आहे. कारण ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आम्हीच सेमी फायनलमध्ये पोहोचणार, असे ठासून सांगितले होते. पण अफगाणिस्तानने अखेर त्यांना वर्ल्ड कपच्या बाहेर काढले आहे.

अफगाणिस्तानच्या संघाला ड्वेन ब्राव्होसारखा निष्णात प्रशिक्षक लाभला आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानचा सेमी फायनलमध्ये सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यात ते विजय मिळवतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-25T14:57:08Z dg43tfdfdgfd