IND VS ENG : सेमी फायनलपूर्वी भारतासाठी आली गुड न्यूज, रोहित शर्माची चिंता मिटली...

गयाना : भारताला सेमी फायनमलध्ये आता इंग्लंडशी दोन हात करायचे आहेत. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी आता भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. त्यामुळे भारताचा वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो. त्यामुळे आता भारताचा कर्णधार रोहित शर्माची चिंता मिटली आहे.

सेमी फायनलमध्य पोहोचल्यावर दोन्ही संघांवर दडपण वाढलेले असेल, असे सर्वांनाच वाटत होते. पण आता भारतीय संघावरील दडपण आता कमी झाले आहे. कारण हा सामना सुरु होण्यापूर्वी एक अशी गोष्ट समोर आली आहे की, त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. या एका गोष्टीचा फायदा भारताला सामना खेळताना नक्कीच होणार आहे. त्यामुळेच रोहित शर्मावरील दडपण आता कमी झाले असेल.

भारताचा हा सामना गयाना येथे होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ठरली आहे ती खेळपट्टी. आतापर्यंत सर्वांना संथ खेळपट्टी पाहायला मिळाली आहे. पण गयानाची खेळपट्टी ही फिरकीला मदत करणारी असल्याचे आता समोर आले आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघातील कुलदीप यादव हा भन्नाट फॉर्मात आहे. भारताच्या विजयात त्याचे मोलाचे योगदान आहे. अक्षर पटेलही चांगली गोलंदाजी करत आहे. पण रवींद्र जडेजाला हवा तसा सूर गवसलेला नाही आणि हीच चिंतेची बाब आहे. पण ही खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असल्यामुळे जडेजा या सामन्यात फॉर्मात येऊ शकतो. भारताकडे तीन अव्वल दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत आणि ते १२ षटके टाकतील. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवदेखील कामचलाऊ फिरकी गोलंदाजी करू शकतात. त्यामुळे सेमी फायनलला सुरुवात होण्यापूर्वी आता भारतासाठी खेळपट्टीच्या रुपात आता एक गुड न्यू आली आहे.

भारतीय संघ चांगल्या फॉर्मात आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात त्यांचे धाबे दणाणले असतील. कारण ऑस्ट्रेलियाने जोरदार आक्रमण करत भारताला बॅकफूटवर ढकलले होते. पण मोक्याच्या क्षणी भारताने सामन्यात ट्रेव्हिस हेडची विकेट मिळवली आणि भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे भारताला हा सामान जिंकता आला होता. पण आता भारतापुढे आव्हान आहे ते इंग्लंडचे.

भारत आणि इंग्लंड हे दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांत चांगली लढत व्हावी, अशीच चाहत्यांच आशा असेल. पण या लढतीत भारताचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळे आता या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो आणि फायनलचे तिकीट बुक करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे या सामन्याचा प्रत्येक क्षण पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतील.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-26T11:15:17Z dg43tfdfdgfd