MS DHONI:मैदानात घुसलेल्या चाहत्याची धोनीने केली विचारपूस, माही म्हणाला की, "तुझ्या शस्त्रक्रियेची...

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४च्या १७ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला मोक्याचा सामन्यात रॉयल चॅलेंजर्सबेंगळुरू संघाकडून हार पत्करावी लागली. या हंगामात महेंद्र सिंग धोनी कर्णधार नसून ऋतुराज गायकवाडने सीएसकेचे कर्णधारपद भूषवले होते. या हंगामात धोनीच्या चाहत्यांनी तर जवळ जवळ कहरच केला होता. काही चाहते तर थेट चालू सामन्यात मैदानात केवळ माहीला भेटण्यासाठी उतरले.

या हंगामात ऋतुराजला सीएसकेचे नेतृत्वत दिल्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या अधिकच तीव्र झाल्या. धोनीनेसुद्धा या हंगामात त्याच्या फलंदाजीने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले, या हंगामात माहीने षटकारांचा पाऊस केला. धोनीच्या गुडघ्यांना गंभीर दुखापत असताना सुद्धा तो केवळ चाहत्यांनासाठी हा हंगाम खेळला आहे असे सीएसकेच्या एका प्रशिक्षकाने सांगितले.

या हंगामात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यात धोनीच्या चाहत्याने तर थेट चालू सामन्यात मैदानात उडी मारली आणि धोनीच्या दिशेने धावला आणि धोनीच्या पाया पडतं त्याने नंतर धोनीला मिठी मारली, या चाहत्याची खूप चर्चा झाली त्यानंतर त्याने एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली आहे, त्यात त्याने धोनीसोबतच्या मुलाखतीचा किस्सा सांगितला.

चाहत्याने सांगितलं धोनीसोबतचा तो अनुभव

या चाहत्याचे नाव जय जानी असून त्याने नुकतीच एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली असून त्यात तो म्हणाला की, "मी त्यादिवशी २१ सेकंद धोनीसोबत होतो, मी स्वतःमध्ये हरवून गेलो होतो, जेव्हा धोनी धावत आला तेव्हा मला वाटले की तो निघून जाईल, मला भेटणार नाही, म्हणून मी हात उंचावून शरणागती पत्करली आणि मी ओरडलो धोनी सर… मग धोनी म्हणाला अरे मी पळत जायचे नाटक केले, हे ऐकताच मी भारावून गेलो आणि सरळ त्यांच्या पाय पडलो आणि रडू लागलो. त्यानंतर मग थेट मिठी मारली. त्या फिलिंगबद्दल मी कायच सांगू '

धोनीने घेतली चाहत्याची अशी काळजी

"माही भाईने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला अचानकच दम लागायला लागला, त्यावर धोनीने माझी चौकशी करत विचारले की, तुला दम का लागतोय? मी म्हणालो मला नाकाचा त्रास आहे आणि मी मैदानात उडी मारली म्हणून, माझ्या नाकावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे , त्याआधी मला तुम्हाला भेटायचे होते म्हणून मी आलो, असे जयने माहीला सांगितले, तेव्हा धोनी म्हणाला की, तुझ्या शस्त्रक्रियेची काळजी मी घेईन, तुला पुन्हा नाकाचा त्रास नाही होणार, आणि या लोकांसोबत आता तू बाहेर जा, हे तुला सुरक्षित बाहेर सोडतील, तुला काही होणार नाही".

The fan who invaded the pitch to meet MS Dhoni had breathing issues.

MS when the fan tells him this - "I will take care of your surgery. Nothing will happen to you, don't worry. I won't let anything happen to you". ❤️pic.twitter.com/9uMwMktBxZ

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 29, 2024 ]]>

"मला माझ्या डोळ्यातील अश्रू आवरता आले नाहीत, एका सिक्युरिटी गार्डने माझ्या गळ्यात हात घालून मला पकडले तेव्हा धोनीने याला काहीही करू नकोस असे तीन वेळा सांगितले तर त्याच्याशी नीट वाग, दुसऱ्या गार्डने मला कंबरेला धरले तेव्हा धोनीने हात काढून टाकायला सांगितले, त्याला श्वासोच्छवासाचा त्रास आहे, त्याला काहीच करू नका"असे धोनीने सिक्युरिटी गार्डला सांगितले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-30T09:48:36Z dg43tfdfdgfd