T20 WC 2024: टीम इंडियाने पार केली ‘अफगाण खिंड’; सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी ठरली निर्णायक

भारताच्या फलंदाजांची विस्फोटक फलंदाजी, रोहित शर्माची चालाख कॅप्टन्सी आणि बुमराह-कुलदीपच्या भेदक गोलंदाजीसह भारताने अफगाणिस्तानवर ४८ धावांनी विजय मोठा मिळवला. सामन्याच्या सुरूवातीला भारताचा डाव गडबडला खरा पण प्रत्येक फलंदाजाने दिलेल्या धावांच्या योगदानाने भारताने चांगली धावसंख्या उभारली. पण अफगाणिस्ताननेही भारताच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून ठेवले होते. यानंतर आलेल्या जागतिक क्रमवारीतील नंबर वन टी-२० फलंदाज असलेल्या भारताच्या सूर्यकुमार यादवने आपला क्लास दाखवत एक झंझावाती अर्धशतकी खेळी केली. तर हार्दिकसोबतची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. तर बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करत ७ धावा देत ३ विकेट्ससह सर्वाेत्कृष्ट गोलंदाजी केली. तर अक्षर पटेल, जडेजा आणि कुलदीपसारख्या गोलंदाजांनी त्याला साथ दिली.

2024-06-20T18:24:39Z dg43tfdfdgfd