VIRAT KOHLI:"विराट कोहली जर पाकिस्तानाकडून खेळला असता तर.." पाकिस्तानी माजी कर्णधाराने कोहलीच्या चाहत्यांबद्दल केले मोठे वक्तव्य

मुंबई :टी-२० वर्ल्डकप २०२४चा १९ वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे, न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना सुरू होईल. भारत पाकिस्तान सामन्यावर जगभरातील क्रिकेटप्रेमींची नजर असते आणि खास नजर असते ते विराट कोहलीकडे. विराटचे जगभरात तर खूप चाहते आहेतच पण पाकिस्तानातही आहेत याचा खुलासा सामन्यापूर्वी पाकिस्तानचे माजी कर्णधार अझहर अलीने यांनी केला आहे.

अझहर अलीने विराटच्या चाहत्यांबद्दल म्हणाला..

भारत आणि पाकिस्तानचे संबंध जरी ताणतणावचे असले तर क्रिकेट मात्र सगळ्यांना एकत्र आणते याचे उत्तम उदाहरण पाकिस्तानचे माजी कर्णधार अझहर अलीने यांनी सांगितलेली विराटबद्दलची एक गोष्ट. अझर म्हणाले, "जर कोहली कधी पाकिस्तानात खेळला तर तुम्हाला तिथले वातावरण हिरवं-हिरवं दिसेल कारण स्टेडिअम हिरव्या जर्सींनी भरून जाईल तर जर्सीच्या मागच्या बाजूला पाकिस्तानी खेळाडू बाबर आझम किंवा शाहीन आफ्रिदीचे नसेल कारण कोहलीचे नाव असेल आणि त्यासोबतच जर्सी नंबर १८ ही असेल".

अझर विराटच्या खराब कामगिरीवर म्हणला

अझर विराटच्या खराब कामगिरीवर म्हणाला, "काही काळापूर्वी जेव्हा कोहली धावा करू शकत नव्हता तेव्हा तो मी त्याच्यासाठी प्राथर्ना करायचो, सलग तीन वर्षे मी कोहलीची अल्ल्हाकडे प्राथर्ना केली आहे माहित नाही का पण केली."

पाकिस्तानविरुद्ध विराट

टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या भारतविरुद्ध आयर्लंड सामन्यात विराट फक्त १ धाव काढू शकला होता, अशा परिस्थितीत तो स्वतःची कामगिरी सुधरवेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये कोहलीचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. कोहलीने ५ सामन्यात ४ अर्धशतकांसह एकूण ३०८ धावा केल्या आहेत. टी-२० वर्ल्डकप मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण सात वेळा सामने झाले असून या सात सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानवर वर्चस्व राखले आहे. भारताने पाच सामने जिंकले असून पाकिस्तानने फक्त एकच सामना जिंकला आहे तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-09T08:11:59Z dg43tfdfdgfd