"जेव्हा मी क्रिकेट सोडेन... " भारतीय गोलंदाजाने सांगितला क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरच प्लॅन

मुंबई: टी-२० वर्ल्डकपची मोहिम आता चांगलीच रंगली असून टीम इंडियाची पहिली लढत आयर्लंडविरुद्ध ५ जूनला न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडेल. भारतीय संघात अनके खेळाडूंचा जोरदार कमबॅक झाला, त्यात एक नाव येते ते म्हणजे गोलंदाज फिरकीपट्टू कुलदीप यादवचे. नुकताच कुलदीप कमबॅकबद्दल बोलला आहे.

कमबॅकचे श्रेय यांना दिले

कुलदीप म्हणाला,"मला कधीच वाटलं नव्हतं की मागच्या काही वर्षांमध्ये माझ्यामध्ये इतका ग्रोथ होईल जेव्हा मी २०२२मध्ये दिल्ली कॅपिटल संघाकडून खेळत होतो तेव्हा मला आत्मविश्वासाची गरज होती, मला आजही आठवते ज्या दिवशी मी पहिल्यांदा रिकी पॉंटिंगला भेटलो,त्यांनी मला मिठी मारली तर ते मला म्हणाले की, आम्हाला तू संघात हवाच होतास, मला तुझे कौशल्य माहित आहे आणि तू या हंगामाचे सगळे सामने खेळशील, तर ऋषभ पंतनेही मला खूप मदत केली तो माझ्या भावासारखा आहे, त्याने नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला पूर्ण पाठिंबा दिला".

"मी वॉटसनसोबतही खूप वेळ घालवला आहे, माझा त्याच्यासोबत खूप चांगला बॉण्ड तयार झाला आहे, मी त्याला सगळं सांगायचो, आयपीएल दरम्यान आम्ही रूममध्ये तासनतास बोलत बसायचो, मला जो काही त्रास आहे किंवा अडचण आहे ते मी त्याच्या जवळ मोकळेपणाने बोलायचो, माझ्या कमबॅकमध्ये व्हॉटसनची खूप महत्वाची भूमिका आहे," कुलदीप म्हणाला.

कुलदीप स्वप्नांबद्दल म्हणाला

"भारतासाठी वर्ल्डकप जिंकणे हे माझे स्वप्न आहे आणि हा माझा पहिला टी-२० वर्ल्डकप आहे, मी सध्या २९ वर्षांचा आहे आणि मला खूप कालावधीसाठी खेळायचे आहे, जर तुम्ही भारतासाठी दीर्घकाळ खेळत असाल तर ट्रॉफी मिळवणे आवश्यक आहे आणि माझा तो प्रयत्न नेहमीच असेल, त्यामुळे वर्ल्डकप जिंकणे माझे स्वप्न आहे," कुलदीप म्हणाला.

क्रिकेटनंतर हे खेळणार

"क्रिकेटच्या पलीकडे, मला फुटबॉल कोचिंगमध्ये लायसन्स मिळावं अशी अपेक्षा आहे, नक्की मी काही फुटबॉलमध्ये परिपूर्ण नाही पण मी ते नीट शिकेन त्यात खूप वेळ खर्च करेन, जेव्हा मी क्रिकेट सोडेन तेव्हा मी फुटबॉल खेळेन किंवा त्यासाठी जास्त वेळ खर्च करेन अशी माझी इच्छा आहे, मला फुटबॉलमध्ये काहीतरी योगदान द्यायला नक्कीच आवडेल", कुलदीप म्हणाला.

कुलदीप म्हणाला, " जड्डू (रवींद्र जडेजा) भाईशी माझी मैत्री ही फक्त क्रिकेट पूर्ती नाही तर आम्ही क्रिकेटबद्दल खूपच कमी बोलतो याउलट मात्र, ऐश भाईसोबत (रविचंद्रन अश्विन) आम्ही खेळाबद्दल खूप बोलतो,मला पूर्वी गोलंदाजीबद्दल नवीन कल्पना वापरण्याची सवय नव्हती, परंतु अश्विनने मला नवीन गोष्टी शिकण्यास भाग पाडले".

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-05T10:11:44Z dg43tfdfdgfd