IPL 2024 FINAL : गौतम गंभीरचा एक निर्णय ठरला केकेआरसाठी गेमचेंजर, या खेळाडूला बनवले मॅचविनर

चेन्नई : गौतम गंभीर केकेआरच्या संघात आला आणि त्याने एक मोठा निर्णय घेतला. हा एकमेव निर्णय केकेआरसाठी गेमचेंजर ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण गंभीरने या एका खेळाडूला मॅचविनर बनवल्याचे पाहायला मिळाले.

गंभीरने संघात दाखल झाल्यावर काही महत्वाच्या गोष्टी केल्या. सुरुवातीला तर त्याने संघात सकारात्मकपणा कसा आणले जाईल, हे पाहिले. त्याने संघातील खेळांडूमध्ये जिंकण्याची इर्षा निर्माण केली. गंभीरने खेळाडूंना सांगितलं की, मी संघात आलोय त्याचा आनंद साजरा करू नका. जेव्हा आपला संघ पोडियमवर असेल आणि आयपीएलची ट्रॉफी आपल्या हातात असेल तो क्षण माझ्यासाठी सर्वात आनंदाचा असेल. या वाक्यासह सुरुवातीपासूनच गंभीरने संघाला जेतेपद जिंकण्याची आशा दाखवली. त्याचबरोबर गंभीरने या संघातील एक खेळाडू हेरला आणि त्याला त्याने मॅचविनर बनवल्याचे पाहायला मिळाले.

केकेआरने या हंगामात एकामागून विजय साकारले. केकेआरचा संघ हा बलाढ्या दिसत होता, कारण संघाचा समन्वय हा चांगला होता आणि त्याची बांधणी गंभीरने केली होती. कोणत्याही सामन्याच विजय मिळवायचा असेल तर त्यासाठी सुरुवात ही चांगली व्हायला हवी, असे गंभीरला वाटत होते. त्यामुळे गंभीरने सुरुवात चांगली कशी होईल, यावर भर दिला. गंभीर एक यशस्वी सलामीवीर राहीला आहे आणि त्यामुळेच त्याने एका सलामीवीबाबत मोठा निर्णय घेतला.

संघाची चांगली सुरुवात करण्यासाठी गंभीरने एक धडाकेबाज सलामीवीर निवडला आणि तो होता सुनील नरिन. काही झालं तर नरिन हाच केकेआरच्या डावाची सुरुवात करेल, हे गंभीरने ठासून सांगितले. सुनीलनेही त्याला निराश केले नाही. कारण सुनीलने या हंगामात सर्वाधिक पॉइंटचा पुरस्कारही पटकावला. सुनीलने यावेळी संघाला बऱ्याचदा झोकात सुरुवात करून दिली. सुनीलने आपल्या वेगवेगळ्या फटक्यांनी चाहत्यांची मनं जिकली आणि केकेआरलाही चांगली सुरुवात मिळायला लागली. त्यामुळे गंभीरने जो निर्णय घेतला होता तो किती योग्य होता, हे यावेळी पाहायला मिळाले.

गंभीरने सुनीलला सलामीवीर म्हणून खेळवण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांच्या पथ्यावर पडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे गंभीरचा हा एक निर्णय त्यांच्यासाठी चंगलाच गेमचेंजर ठरला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-27T05:06:07Z dg43tfdfdgfd