NZ VS UGA: न्यूझीलंडने युगांडाला लोळवले; ८८ चेंडू राखून मिळवला दमदार विजय

मुंबई : टी-२० वर्ल्डकप २०२४च्या ३२व्या सामन्यात न्यूझीलंडने युगांडाचा ९ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना युंगाडा संघ अवघ्या ४० धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ५.२ षटकांत सामना जिंकला. न्यूझीलंडकडून सलामीवीर डेव्हन कॉनवेने सर्वाधिक २२ धावांची नाबाद खेळी खेळली. टीम साऊदीने गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी करत ३ बळी तर ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर युगांडाचा संघ १८.४ षटकांत ४० धावा करून सर्वबाद झाला. युगांडाकडून रोनक पटेल आणि सायमन सेसजी सलामीसाठी मैदनात उतरले आणि सेसजी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. रोनक २ धावा करून पव्हेलियनमध्ये परतला तर संघाकडून केनेथ वायस्वाने सर्वाधिक ११ धावा केल्या.दिनेक नाकराणी ४ धावा करून बाद झाला तर कर्णधार मसाबा ३ धावा करून नाबाद राहिला.

युगांडाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाने ५.२ षटकांत लक्ष्य गाठले. फिन ऍलन आणि डेव्हॉन कॉनवे न्यूझीलंडकडून सलामीला आले आणि ९ धावा करून ऍलन बाद झाला. कॉनवेने सर्वाधिक नाबाद २२ धावा केल्या रचिन रवींद्रने नाबाद १ धावा केल्या आणि अशाप्रकारे न्यूझीलंड संघ ८८ चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकले.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा कहर

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. मिचेल सँटनरने ३.४ षटकात ८ धावा देत २ बळी घेतले. बोल्टने ४ षटकात केवळ ७ धावा देत २ बळी घेतले. सौदीने ४ षटकात केवळ ४ धावा दिल्या आणि ३ बळी घेतले. रचिन रवींद्रने ३ षटकांत ९ धावा देत २ बळी घेतले तर लॉकी फर्ग्युसनने १ बळी घेतला.

न्यूझीलंड आणि युगांडाचे संघ सुपर ८च्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. या टी- २० वर्ल्डकप मध्ये न्यूझीलंडने ३ सामने खेळले आहेत असून युगांडाविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडला यश आले आहे. युगांडा ४ सामने खेळले असून १ सामना जिंकले आहे तर हे दोन्ही संघ क गटात आहेत. या गटातून अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज सुपर- ८ साठी पात्र ठरले आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-15T04:33:39Z dg43tfdfdgfd