ROHIT SHARMA: रोहित शर्मा PLAYING XI बद्धल स्पष्टच बोलला,"या चौघांची भूमिका..."

मुंबई: टी-२० वर्ल्ड कपच्या मोहिमेला आता सुरुवात झाली असून टीम इंडियाची पहिली लढत आयर्लंडविरुद्ध ५ जूनला रंगणार आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामनापार पडणार असून या पीचवर गोलंदाजांची उत्तम कामगिरी पाहायला मिळतेय त्यामुळे आता अशा परिस्थितीत भारताची playing xi कशी असेल असा प्रश्न चाहत्यांच्या मनात असताना रोहितने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान, भारताच्या पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली या परिषदेत रोहित शर्माने पीच आणि टीम संयोजनाबाबत काही गोष्टी सांगितल्या तर playing xi कशी असणार आहे त्याबद्दल त्याने सांगितले आहे. रोहित म्हणाला, "टीम इंडिया ४ स्पिनर्ससोबत मैदानात उतरणार की नाही ते अजूनही सिक्रेट असणार आहे तर आमच्याकडे दोन स्पिनर्स आणि दोन ऑलराऊंडर आहेत, यामध्ये कुलदीप, युझवेंद्र यांच्याशिवाय जडेजा आणि अक्षरसारखे खेळाडू आहेत तर त्यामुळे टीमचा समतोल साधायचा असेल तर तुमच्याकडे ऑलराऊंडर खेळाडू असणं आवश्यक आहे.

रोहित शर्मा पुढे म्हणाला, "या चौघांची भूमिका या वर्ल्डकपमध्ये कशी महत्त्वाची असेल, याबद्दल आम्ही अजून विचार केलेला नाही, जशी परिस्थिती समोर येईल त्यानुसार आम्ही निर्णय घेणार आहोत, या चारही खेळाडूंना योग्यरितीने संधी मिळेल यावरच आमचा भर असणार आहे, या चौघांना एकाच सामन्यात खेळायची संधी मिळाली तर ते उत्तमच आहे, मात्र तसं नाही झालं तर आम्ही त्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग शोधून काढू".

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

आयर्लंड संघ

पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, एंड्रयू बालबर्नी, कर्टिस कँपर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, ग्राहम ह्यूम, जोश लिटिल, बॅरी मॅक्कार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर, बेन व्हाईट, क्रेग यंग

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-05T08:41:27Z dg43tfdfdgfd